Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी जाते तो कोई गम नहीं…

Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी जाते तो कोई गम नहीं…

Atiq Ahmed Murder Case : उत्तर प्रदेशमधील (UP)प्रयागराज (prayagraj)येथील अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांच्या मारेकऱ्यांनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे (Shocking revelations)केले आहेत. त्यांनी प्रयागराजमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. एवढेच नाही तर तिघांनीही येथे आठवडाभर अभ्यास केला. चौकशीदरम्यान, लवलेश तिवारी(Lovelesh Tiwari), सनी आणि अरुण मौर्य (Arun Maurya)या तिन्ही आरोपींनी पोलिसांना सांगितले की, त्यांचा मृत्यू झाला असता तरी त्यांना दु:ख वाटले नसते. यावरुन असे दिसून यते की, हे मारेकरी जिवावर उदार होऊनच आले होते.

अतिक अहमदच्या हत्येसाठी वापरलेल्या बाईकबाबत मोठा खुलासा, काय होता प्लॅन?

चौकशीदरम्यान तिघेही म्हणाले की, अतिक आणि अशरफ आमच्या निष्पाप भावांची हत्या करत आहेत. तसा ते प्रयत्न करत होते. ते म्हणाले की, आम्ही धर्माचे काम केले आहे. अन्याय संपला. आमचा कोणताही राग नाही. आम्हाला फासावर लटकवले तरी आम्ही हसत हसत त्याला सामोरे जाऊ. आम्ही आमचे काम केले आहे. असेही यावेळी मारेकऱ्यांनी सांगितले आहे.

दुसरीकडे, तीन नराधमांची चौकशी करणाऱ्या क्राइम ब्रँचच्या टीमने बांदा, हमीरपूर आणि कासगंजच्या पोलिसांकडून आरोपींची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी रेकॉर्डची माहिती मागवली आहे. प्रयागराजच्या शाहगंज पोलीस ठाण्यात अतिक आणि अशरफ यांच्या हत्येचा एफआयआर दाखल करण्यात आला.

शनिवारी रात्री लवलेश, सनी आणि अरुण मौर्य या तिघांनी पत्रकारांच्या भूमिकेत अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेत असताना त्यांची हत्या केली. तिघांनी जवळपास 17 राऊंड गोळीबार केल्याचे समजते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube