अतिक अहमदच्या हत्येसाठी वापरलेल्या बाईकबाबत मोठा खुलासा, काय होता प्लॅन?

अतिक अहमदच्या हत्येसाठी वापरलेल्या बाईकबाबत मोठा खुलासा, काय होता प्लॅन?

Atiq Ahmad Shot Dead : उमेश पाल खून प्रकरणातील (Umesh Pal Murder)आरोपी अतिक अहमद (Atiq Ahmad)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांची शनिवारी रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या तीन आरोपींनी केली होती. मात्र दोघांचे मारेकरी घटनास्थळी मोटारसायकलवरून आले होते. आता त्या बाईकबाबत मोठा खुलासा झाला आहे.

विजय शिवतारे म्हणाले, अजितदादांनी आम्हाला सपोर्ट केल्यास राज्याचं राजकारण सोपं…

या खून प्रकरणात पल्सर बाईकचा वापर करण्यात आला होता. या बाईकवरून हल्लेखोर आल्याचा दावा केला जात आहे. त्या बाईकचा नंबरही समोर आला आहे, मात्र समोर आलेला बाईकचा नंबर बनावट असल्याचा दावा केला जात आहे. पोलीस तपासातही ती नंबरप्लेट बनावट असल्याचे समोर आले आहे.

असं असलं तरीही बाईक नेमकी आणली कुठून याचा तपास सुरू आहे. फॉरेन्सिक टीमचे पाच अधिकारी या प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करत आहेत. प्रत्येक पुराव्याच्या आधारे अधिकारी तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीत आरोपींशी संबंधित अनेक खुलासे झाले आहेत. अतिक आणि अश्रफ यांची हत्या करणारे तिन्ही आरोपी प्रयागराज बाहेरील असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.

अतिक अश्रफची हत्या करणारा लवलेश तिवारी हा बांदा येथील रहिवासी आहे. तर अरुण मौर्य हा हमीरपूरचा रहिवासी असून तिसरा आरोपी सनी कासगंजचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube