पुण्यातील मुंढवा परिसरातील अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. (Pune) अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के मालकी, तर दिग्विजय पाटील यांची केवळ 1 टक्के मालकी असल्याचे समोर आले आहे.
याच प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवार यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता ‘महाराष्ट्राचे गृहमंत्री याचं उत्तर देऊ शकतील, मी देऊ शकत नाही’, असे त्यांनी म्हटले. आता शरद पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
Video : नातू पार्थ पवारांचा जमीन घोटाळा गंभीर; आजोबा शरद पवारांनी प्रतिक्रिया देत केली मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी त्याचे कारण स्पष्टपणे सांगितलेले आहे. हा एफआयआर आहे. एफआयआर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. त्यात ज्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यांच्यावर तरच गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कंपनीचे ऑथराईज सिग्नेटरी जे होते, ज्यांनी हा सगळा व्यवहार केला, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यासोबत सरकारमधील ज्यांनी या संदर्भात मदत केली त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
आमचा कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही. कोणाला वाचवण्याचे कारण नाही. जे झाले ते नियमानुसार झालेले आहे. मी यापूर्वी देखील सांगितले की, या गुन्ह्याचा तपास सुरू असताना कोणाचा सहभाग आढळला तर आपल्याला कारवाई करावीच लागते. नियमानुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
'रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पस’च्या पायाभरणीदरम्यान माध्यमांशी संवाद…
(गडचिरोली | 8-11-2025)#Maharashtra #Gadchiroli #ViksitGadchiroli pic.twitter.com/hS06xXJnb0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2025
