Download App

दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत खलबतं; दिग्गज नेत्यांची हजेरी, लोकसभा निवडणुकीसाठी थोपटले दंड…

New Delhi Congress Meeting : मुलभूत प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठीच काँग्रेस फुटणार असल्याची अफवा भाजपकडून केली जात असून काँग्रेस तुटणार नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 48 मतदारसंघात तयारी सुरु असल्याचंही पटोलेंनी स्पष्ट केलंय. दरम्यान, दिल्लीत आज काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंसह, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांची उपस्थिती होती. तर महाराष्ट्र काँग्रेसच्या एकूण 25 नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय. या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Congress meeting in Delhi, Nana Patole Says Planned Lok Sabha strategy)

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई अशा जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून अफवा पसरवली जात आहे. आजच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आगामी लोकसभा निवडणुकीचं काम सुरु करण्याच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस तुटणारही नाही आणि फुटणारही नाही, या शब्दांत नाना पटोलेंनी ठणकावून सांगितलं आहे.

Mazgaon Dock मध्ये  बंपर भरती, आठवी-दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज, अर्जाची शेवटची तारीख 26 जुलै

तसेच पुढे बोलताना नाना पटोलेंनी सांगितलं की, पक्षाच्या आदेशानूसार लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानूसार कामही सुरु करण्यात आलं आहे. आजच्या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यावरुन काँग्रेस फुटणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली आता काँग्रेस फुटणार असल्याची अफवा भाजपकडून करण्यात येत आहे. पण आजच्या काँग्रेस नेत्यांच्या हजेरीवरुन काँग्रेस फुटणार नसल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या 48 जागांवर तयारी सुरु असल्याचं पटोलेंनी स्पष्ट केलं आहे.

वर्षावर शिंदे-फडणवीस अन् पवारांमध्ये तीन तास खलबतं; खाते वाटपाचा तिढा सुटणार?

मल्लिकार्जून खर्गे म्हणाले :
भाजपने वॉशिंग मशिनचा वापर करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवली आहे. भाजपच्या या रणनीतीचा काँग्रेस पार्टी चोख प्रत्युत्तर देणार असून महाराष्ट्राची जनताच भाजपला प्रत्युत्तर देणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच काँग्रेसचं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायमच स्थान असून काँग्रेस महाराष्ट्रासोबत असलेल्या नात्याला आणखी मजबूत बनवणार असल्याचा विश्वास खर्गेंनी व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात पाणीबाणी! जायकवाडी धरणाचं पाणी पिण्यासाठी आरक्षित…

राहुल गांधी म्हणाले :
महाराष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला पक्षाच्या मजबूतीसाठी आणि जनतेचा आवाज उठवण्यावर लक्ष केंद्रीत असून महाराष्ट्रातल्या प्रस्थापित सरकारचा पराभव आम्ही मिळून करणार आहोत, असं गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधींकडे ‘ही’ खास बाईक, मेकॅनिकसमोर सगळं काही सांगितलं

वर्षा गायकवाड म्हणाल्या :
आगामी लोकसभेसाठी कशी रणनीती असणार? यावर आजच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आलं आहे. यासोबतच सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे यावरही चर्चा झाली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच काँग्रेसकडून हालचाली सुरु करण्यात आल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु आहे. महाविकास आघाडीतल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आता राज्यात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष असल्याचं बोललं जात आहे. आजच्या बैठकीनंतर आम्ही लोकसभेच्या 48 जागा लढवण्याची तयारी सुरु असल्याचं नाना पटोलेंनी सांगितल्याने आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची काय रणनीती असणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us