राहुल गांधींकडे ‘ही’ खास बाईक, मेकॅनिकसमोर सगळं काही सांगितलं
कॉंग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) बाईकवरून जम्मू-काश्मीर, लडाखचा प्रवास करायचा आहे. त्यांच्याकडे KTM 90 बाईक आहे, पण ती धुळखात पडून आहे. कारण सुरक्षारक्षक त्यांना बाईक (bike) चालवू देत नाहीत. राहुल गांधींनी 27 जून रोजी दिल्लीतील करोलबाग येथील बाईक मेकॅनिकसमोर या गोष्टी सांगितल्या. या संभाषणाचा व्हिडिओ राहुल यांनी रविवारी यूट्यूबवर शेअर केला. (Rahul Gandhis interaction with a motor mechanic)
भारत जोडो यात्रा संपल्यानंतरही राहुल गांधींनी सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत आहेत. विविध क्षेत्रातील सर्वसामान्यांना ते सतत भेटत असतात आणि त्यांच्या समस्या ऐकून घेत आहेत. 23 मे रोजी राहुल गांधी दिल्ली ते चंदीगड प्रवासादरम्यान ट्रकमधून प्रवास करताना दिसले होते. कर्नाटक निवडणुकीदरम्यान ते बेंगळुरूमध्ये एका डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवताना दिसले. त्यांच्या अमेरिकन दौऱ्यातही राहुल गांधींनी ट्रक चालकासोबतही निवांत गप्पा मारल्या होत्या. तर आताही त्यांनी दिल्लीतील करोलबाग येथील मेकॅनिक मार्केटमध्ये गेले. तेथे त्यांनी कार दुरुस्त करणार्या मेकॅनिकशी संवाद साधला आणि स्वतः बाईकची सर्व्हिसही केली.
यावेळी त्यांनी गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. या 12 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांचा करोलबागचा संपूर्ण प्रवास आहे. यामध्ये ते मेकॅनिकच्या प्रश्नांची उत्तरे देतांना दिसतात. मेकॅनिकशी गप्पा मारताना एका मेकॅनिकने त्यांना लग्नाबाबत विचारले. मेकॅनिकने विचारलं की, तुमचे लग्न कधी होणार आहे? या प्रश्नावर राहुल गांधी हसले आणि म्हणाले बघूया, होईल लवकरच… यानंतर राहुल यांनी त्या मेकॅनिकलाही तुझे लग्न झाले का? असं विचारले.
Ashes 2023: हॅरी ब्रूकने किल्ला लढवला; इंग्लंडचे कमबॅक, तिसऱ्या कसोटीत मिळवला शानदार विजय
बाईक सर्व्हिसिंगनंतर राहुल म्हणाला, मेकॅनिक लोक कसे काम करतात, त्यांचे जीवन किती कठीण असते, हे मला समजून घ्यायचे होते. मला तुमच्या लोकांचे काम कळले आहे. जो मेकॅनिक नाही, जो गाडीवर काम करत नाही, त्याला गाडी दुरुस्त करण्यासाठी काय लागते हे माहीत नाही. मला फक्त ते किती कठीण आहे हे समजून घ्यायचे होते. ते पुढे म्हणाले की, या तुमच्याशिवाय कामे होऊ शकत नाही.
ते म्हणाले, शेतकऱ्याशिवाय अन्न नाही. पण लोकांना शेतकऱ्यांबद्दल कृतज्ञता वाटत नाही. यावर मेकॅनिक म्हणाला की, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. आम्हीही खूप कष्ट करतो, पण कंपनीचे लोक कधीच येऊन विचारत नाही की, तुम्ही कसे जगता, कसे कमावता?
राहुल यांच्याकडे कोणती बाईक आहे?
एका मेकॅनिकने राहुल यांना विचारले, तुमच्याकडे कोणती बाईक आहे? त्यावर राहुल म्हणाले, माझ्याकडे KTM 390 आहे. पण, यावेळी राहुल गांधींनी त्यांची एक व्यथाही सांगितली. त्यांना इच्छा असूनही बाईक चालवता येत नाही. त्यांच्या सुरक्षेखातर सुरक्षा रक्षक त्यांना दुचाकी चालवू देत नसल्याचं राहुल म्हणाले.