Congress said Gungi Gudiya forgotten history NCP and Ruling alliance are furious criticism on Sunetra Pawar : राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या अध्यक्ष असलेल्या सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसने गुंगी गुडीया म्हणून टीका केली आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यावर राष्ट्रवादीसह सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. यामध्ये अनेकांनी गुंगीया गुडीया शब्दाचा दाखला देत काँग्रेसचा इतिहास आणि इंदिरा गांधींची आठवण करून देत खरपूस समाचार घेतला आहे.
जलसंपदा मंत्री विखे पाटील 5 ऑगस्टला घेणार कुकडी वसीना प्रकल्पाचा आढावा
उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या “गुंगी गुडिया” या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
आम्ही गुंगी गुडिया म्हटलो ते चूक नाही; तुम्ही दुर्गा व्हा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय म्हणाले?
शिवसेना (शिंदे गट) नेते दीपक केसरकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधत, अशाच प्रकारचे शब्द माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठीही वापरले जात होते, याची आठवण करून दिली. कोणत्याही महिला नेतृत्वाचा अशा शब्दांत उल्लेख करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्री दत्ता भरणे यांनीही सुनेत्रा पवार यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत, त्यांच्या विरोधातील वक्तव्याचा निषेध नोंदवला. महिलांचा सन्मान जपण्याची परंपरा महाराष्ट्राची असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसने माफी मागावी, अशी भूमिका मांडली.
कंपनीने म्हटलं आम्ही चुकून… पण अचानक रिव्ह्यूमध्ये गेलेलं व्हॉट्सॲप अकाउंट रिस्टोर कारायचं कसं?
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन, मंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे उदयकुमार आहेर, माजी खासदार नवनीत राणा तसेच अन्य नेत्यांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. काहींनी काँग्रेसवर महिला नेतृत्वाचा अपमान केल्याचा आरोप केला, तर काहींनी इंदिरा गांधी यांच्याविरोधात याच शब्दांचा वापर झाल्याची आठवण करून आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचारांची परवानगी दिल्याने MBBS डॉक्टर गेले संपावर; 24 तास सेवा बंद
दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर संयमित भूमिका घेत प्रतिक्रिया देण्याचे टाळले. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी सुनेत्रा पवार या सक्षम नेतृत्व असल्याचे सांगत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असा सल्ला दिला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या भाषेचा निषेध करत, राजकीय मतभेद असले तरी महिलांविषयी अशा प्रकारची भाषा स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया विचारली असता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य करण्यास नकार दिला.या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली असून, सुनेत्रा पवार यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून विविध पक्षांकडून काँग्रेसवर टीकेची झोड उठताना दिसत आहे.
