होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचारांची परवानगी दिल्याने MBBS डॉक्टर गेले संपावर; 24 तास सेवा बंद
होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील MBBS आणि MD डॉक्टरांनी विरोध सुरू केला आहे.
Maharashtra ccmp doctors allopathy permission mbbs doctors protest: महाराष्ट्र सरकारने मॉडर्न फार्माकोलॉजीचा CCMP कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील MBBS आणि MD डॉक्टरांनी विरोध सुरू केला आहे. या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) 24 तास कामबंद आंदोलन पुकारले. नांदेड, नागपूर, पुणे आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये डॉक्टरांनी आंदोलन केले.
शंभर टक्के नियम पालन तरी परवाना निलंबित; एफडीएला दंड होणार?, उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
डॉक्टरांचा विरोध का?
MBBS डॉक्टरांच्या मते, ॲलोपॅथीचे शिक्षण घेण्यासाठी डॉक्टरांना अनेक वर्षांचा अभ्यास आणि रुग्णालयातील प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे केवळ CCMP सारखा अल्पकालीन कोर्स करून ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी देणे योग्य नाही. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा डॉक्टर संघटनांनी केला आहे.
सरकारकडे काय मागणी?
सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी IMA आणि इतर वैद्यकीय संघटनांनी केली आहे. या आंदोलनाला MARD, ASMI आणि इतर डॉक्टर संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. सरकारने निर्णय मागे घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
थोडक्यात काय झालं?
CCMP केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी देण्याच्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या निर्णयाला MBBS/MD डॉक्टरांचा विरोध असून, रुग्णांची सुरक्षितता हा त्यांच्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा आहे.
‘आपले, संदिग्ध, विरोधी’ मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा