‘आपले, संदिग्ध, विरोधी’ मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा
Rohit Pawar On SIR Campaign : राज्यात सध्या निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहिम सुरु असून या मोहिमेत मतदार यादी अचूक ठेवणे
Rohit Pawar On SIR Campaign : राज्यात सध्या निवडणूक आयोगाकडून एसआयआर मोहिम सुरु असून या मोहिमेत मतदार यादी अचूक ठेवणे, नवीन नोंदणी करणे आणि जुनी नावे तपासण्याचे काम निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या या मोहिमेवर आतापर्यंत अनेक विरोधी पक्षाकडून प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून या मोहिमेचे स्वागत करण्यात आल्याने अनेक आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. नुकतंच पश्चिम बंगाल येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एसआयआर मोहिमेत हजारो मतदारांचे नाव काढून भाजपला फायदा पोहवण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून निवडणूक आयोगावर (Election Commission) होत आहे.
तर आता या मोहिमेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी धक्कादायक दावा करत भाजप (BJP) वर गंभीर आरोप केले आहे. आपले, संदिग्ध आणि विरोधी अशी मतदारांची वर्गवारी करण्यात येत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर लिहिले की, SIR मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली हे प. बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिलं. एकीकडं हे SIR प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपानेही गावपताळीवर आपल्या BLA मार्फत स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली असून त्यांना दिलेल्या लिंकमध्ये मतदारांची पडताळणी केली जाते आणि ही पडताळणी करताना या लिंकमध्ये मतदारांच्या नावापुढे 1. आपले 2. संदिग्ध 3. विरोधी असे तीन पर्याय दिलेले आहेत. यापैकी एका पर्यायाची निवड करुन मतदारांची वर्गवारी करण्याचं काम सुरु आहे.
SIR मोहिम हे एक भयानक प्रकरण असून या माध्यमातून विरोधी विचारांच्या मतदारांची नावे कशी वगळली गेली किंवा भलत्याच ठिकाणी कशी दाखवली गेली हे प. बंगालमध्ये अवघ्या देशाने पाहिलं. एकीकडं हे SIR प्रकरण गाजत असताना आता दुसऱ्या बाजूला भाजपानेही गावपताळीवर आपल्या BLA मार्फत स्वतंत्र यंत्रणा… pic.twitter.com/W8sVqd6O6p
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 4, 2026
यामुळं काही प्रश्न निर्माण होत आहेत.
1.शासकीय यंत्रणा SIR मोहिम राबवत असेल तर त्याच वेळी भाजपनेही आपली समांतर यंत्रणा या कामी कशी लावली?
2.संदिग्ध आणि विरोधी विचारांच्या मतदारांची नावे वगळण्याचा किंवा त्यांना भलत्याच ठिकाणी दाखवण्यासाठी तर हे केले जात नाही ना?
3.कोणत्याही राजकीय पक्षाला मतदारांच्या वैयक्तिक किंवा गोपनीय रेकॉर्ड्चा वापर करुन स्वतःची समांतर राजकीय मोहिम चालणण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असं कोर्टाने सांगितलं असतानाही भाजप हे कोणत्या अधिकारात करत आहे? या प्रश्नांची उत्तरं भाजपाने द्यावीत आणि निवडणूक आयोगानेही याची गंभीर दखल घ्यावी..! असं रोहित पवार यांनी एक्सवर लिहिले आहे.
शिवसेना पक्ष, चिन्हावर ‘सुप्रीम’ सुनावणी; आज ठाकरेंना दिलासा की धक्का?
एसआयआर म्हणजे काय?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एसआयआर मोहिमेत मतदार यादीतील चुका दूर करणे आणि यादी त्रुटीमुक्त करण्यासाठी 21 वर्षांनंतर देशभरात सखोल पडताळणी मोहीम सुरु करण्यात आली आह. 2014 किंवा जुन्या मतदार याद्यांशी (2002) नातेवाईकांची जुळवून पडताळणी केली जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.