कंपनीने म्हटलं आम्ही चुकून… पण अचानक रिव्ह्यूमध्ये गेलेलं व्हॉट्सॲप अकाउंट रिस्टोर कारायचं कसं?
WhatsApp account तुमचंही व्हॉट्सअॅप रिव्ह्यूमध्ये गेलंय? तर ही माहिती तुमच्यासाटी अत्यंत महत्त्वाची आहे.
company clarify but how restore WhatsApp account suddenly gone under review : तुमचंही व्हॉट्सअॅप रिव्ह्यूमध्ये गेलंय का? त्यामुळे तुमचे मेसेजेस आणि कॉलिंग बंद करण्यात आलं का? तर ही माहिती तुमच्यासाटी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सोमवारी व्हॉट्सअॅप जगातील अनेक देशांमध्ये अनेकांचे संशयास्पद असलेले व्हॉट्सअॅप अकाऊंट अचानक रिव्ह्यूमध्ये टाकले. मात्र हे करताना त्यांच्याकडून चूकून संशय नसलेले अकाऊंटही ब्लॉक झाले. यावर आता व्हॉट्सअॅपने स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे जाणून घेऊ तुमचं अकाऊंट रिव्ह्यूमध्ये का गेलं? व्हॉट्सअॅपने संशयास्पद अकाऊंट रिव्ह्यूमध्ये का टाकले?
नेमकं प्रकरण काय?
सोमवारी व्हॉट्सअॅप जगातील अनेक देशांमध्ये अनेकांचे संशयास्पद असलेले व्हॉट्सअॅप अकाऊंट रिव्ह्यूमध्ये टाकले. त्यामुळे अनेक व्हॉट्सअॅप अकाऊंट 24 तासांसाठी रिव्ह्यूमध्ये गेले त्यांचं मेसेजेस आणि कॉलिंग बंद करण्यात आलं. अकाऊंट रिव्ह्यूमध्ये गेलेल्या व्हॉट्सअॅप युझर्सना त्यांच्या स्क्रीनवर एक मेसेज दिसला.
आलिया, तमन्ना अन् श्रद्धा यावर्षी बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज!
यामध्ये म्हटलं होतं की, तुमचं अकाऊंट अंडर रिव्ह्यू आहे. रिक्वेस्ट डेट 3 ऑगस्ट 2026. आमची सर्व्हिस आणि अटींचे पालन केले जात आहे की, यासाठी तुमच्या अकाऊंटच्या अॅक्टीव्हिटीज आणि डिव्हाईसची माहिती तपासली जात आहे. त्यानंतर सोशल मिडीयावर अनेक युझर्सने तक्रारी नोंदवल्या त्यानंतर व्हॉट्सअॅपने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
शंभर टक्के नियम पालन तरी परवाना निलंबित; एफडीएला दंड होणार?, उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी
दरम्यान अशा प्रकारे अकाऊंट अंडर रिव्ह्यू टाकण्याअगोदर कंपनीकडून व्हॉट्सअॅप युझर्सना कोणतीही कल्पना किंवा सूचना देण्यात आली नव्हती. तर भारतात युझर्सना ही समस्या सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास जाणवली.
व्हॉट्सअॅपने काय स्पष्टीकरण दिलं?
या सर्व प्रकरणावर व्हॉट्सअॅपने स्पष्टीकरण देताना म्हटलं की, आम्ही आमच्या सेवेचा गैरवापर करणाऱ्यांपासून पुढे राहण्यासाठी नेहमीच काम करतो त्यासाठी संशयास्पद आणि इतर अधिकृत युझर्सना त्रास देणाऱ्यांचे अकाऊंट बंद करतो. मात्र हे करत असताना आम्ही कधीकधी चूकतो. त्यात अनेक अधिकृत अकाऊंटही बंद केले जातात. मात्र ही चूक आम्ही सुधारू. दरम्यान व्हॉट्सअॅपने तुम्हाला तुमचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्यासाठी काय करायचे? हे सांगितले आहे.
व्हॉट्सॲप अकाऊंट पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावे?
जर तुमच्या व्हॉट्सॲपवर 24 तासांचा रिव्ह्यूचा संदेश दिसत असेल, तर सर्वप्रथम रिव्ह्यू पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. या काळात स्क्रीनवर उपलब्ध असलेल्या “Appeal” पर्यायाचा वापर करून तुम्ही तुमची बाजू मांडा. त्यानंतर जर तुमच्याकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे आढळले, तर बहुतांश प्रकरणांमध्ये खाते 24 तासांच्या आत पुन्हा सुरू केले जाते.
खाते रिव्ह्यूमध्ये जाण्याची काही सामान्य कारणे :
-अधिकृत नसलेले GB WhatsApp, WhatsApp Plus किंवा इतर मॉडिफाइड ॲप्स वापरणे.
-अल्पावधीत मोठ्या प्रमाणात अनोळखी क्रमांकांवर संदेश पाठवणे किंवा स्पॅमसदृश कृती करणे.
-अनेक वापरकर्त्यांकडून तुमच्या क्रमांकाची तक्रार (Report) किंवा ब्लॉक (Block) होणे.
-व्हॉट्सॲपच्या सेवा अटी किंवा वापर नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय निर्माण होणे.
वापरकर्त्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
नेहमी Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड केलेले अधिकृत व्हॉट्सॲपच वापरा. कोणतेही मॉडिफाइड किंवा थर्ड-पार्टी व्हॉट्सॲप ॲप वापरणे टाळा. अशा ॲप्समुळे खाते कायमस्वरूपी बंद होण्याचा धोका असतो. तुमचे खाते चुकून रिव्ह्यूमध्ये गेले असल्यास घाबरू नका. संयम ठेवा, आवश्यक असल्यास अपील करा आणि तपास पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करा. नियमांचे उल्लंघन नसल्यास खाते पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते.