Download App

मोठी बातमी! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक; ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती..

विधानसभेच्या निवडणुकांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Maharashtra Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले (Maharashtra Elections) आहेत. निवडणूक आयोगाने या (Election Commission of India) निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून साधारण पुढील आठवड्यात आचारसंहिता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांचा परिणाम मात्र राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकांमुळे (Elections 2024) सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनावल्यानंतर महायुती सरकारचा निर्णय, 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मागील आठवड्यात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्याचा दौरा केला होता. या अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध राजकीय पक्षांशी चर्चा केली. तसेच निवडणूक तयारीची माहिती घेतली होती. त्यानंतर आता या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहेत. अशा परिस्थितीत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा मागे पडल्या आहेत.

राज्यातील जवळपास 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विधानसभा निवडणुकांच्या दरम्यानच या निवडणुका होतील असे आधी सांगण्यात आले होते. मात्र नव्या माहितीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

राज्यातील सहकारी दूध संघ, बाजार समिती, जिल्हा सहकारी बँक आणि पतसंस्था अशा एकूण 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

follow us