corona virus : कोरोना व्हायरसने (corona virus) पुन्हा एकदा संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं पाठ फिरवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाची चिंता वाढवली आहे. आज (दि. 6 जानेवारी) राज्यात 154 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आज 172 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात शनिवारी दोन रुग्णांना जीव गमवावा लागला. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 98.17 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर मृत्यूदर 1.81 टक्के आहे.
आता कुठलं मंत्रिपद नको अन् मुख्यमंत्रिपदही नको; छगन भुजबळांची थेट भूमिका
शनिवारी राज्यात 14,790 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 2,421 RTPCR चाचण्या होत्या तर 12,369 RAT चाचण्या होत्या. आजचा कोरोना पॉझिटिव्ह दर 1.04 टक्के आहे.
राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्णांची संख्या 139
कोरोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. कारण अनेक ठिकाणी JN.1 व्हेरियंट रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अमेरिका आणि मलेशियामध्ये आढळणारा प्रकार भारतातही दाखल झाला आहे. राज्यात JN.1 व्हेरियंट रुग्णांची संख्या 139 वर पोहोचली आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण 91 तर नागपुरात 30 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ठाण्यात 5, बीडमध्ये 3, छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 आणि नांदेडमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत.
साडेचार लाख वेतन, विमान प्रवास अन् बरंच काही… मराठा आरक्षण सल्लागार मंडळाला ‘क्लास वन’ सुविधा
लक्षणे कोणती?
कोरोनाचा हा नवीन व्हेरियंट संसर्गजन्य आहे. JN.1 मुळे ताप, थकवा आणि शरीर दुखणे यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. काही लोकांना मध्यम गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणे देखील जाणवली आहे.
कोविडची लक्षणे पूर्वीसारखीच आहेत. ताप किंवा थंडी वाजून येणे, खोकला, श्वास लागणे, थकवा, स्नायू दुखणे, डोकेदुखी, चव आणि वास कमी होणे, घसा खवखवणे, नाक बंद होणे, नाक वाहणे, मळमळ आणि अतिसार ही सर्व कोरोनाची लक्षणे आहेत.
कोरोनाच्या या नवीन प्रकारामुळे केंद्र सरकारने आधीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले होते. देशात जेएन-१ व्हेरियंटच्या संख्येत झालेली वाढ पाहता केंद्राने राज्यांना जारी केलेल्या कोविड-19 च्या नवीन मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.
ताप, सर्दी खोकला झाल्यास चाचणी करा
सध्या राज्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे टास्क फोर्सने ताप, सर्दी आणि खोकला झाल्यास कोविडची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. 2 जानेवारी रोजी कोविड टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर तुम्हाला कोरोना असेल तर तुम्हाला पाच दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी मास्कचा वापर करावा. घरातील ज्येष्ठ नागरिक किंवा उच्च जोखमीच्या व्यक्तींनी मास्क वापरावे, अशा सूचना कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष रमण गंगाखेडकर यांनी दिल्या.