Neet Paper Leak Scam : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे मराठवाड्यात आढळून आले आहेत. या प्रकरणात दोन आरोपींना लातूर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. (NEET) सीबीआयच्या वतीने न्यायालयाकडे आरोपींना सात दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली. दरम्यान, आरोपी आणि सरकार पक्षाकडून न्यायालयात युक्तिवाद झाला. (Paper Leak Scam) त्यानंतर लातूर न्यायालयाने या दोघांना ६ जुलैपर्यंत (CBI) सीबीआय कोठडी सुनावली.
सत्संगमधील चेंगराचेंगरीच्या घटनेत मृतांमध्ये वाढ; १२२ वर मृतांची संख्या, १५० पेक्षा अधिकजण जखमी
लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गणवाढीसंदर्भात नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मुख्याध्यापक जलीलखॉ पठाण, शिक्षक संजय जाधव यांना स्थानिक तपास यंत्रणांनी अटक केली. इरण्णा मष्णाजी कोनगलवार हा पोलिसांच्या तावडीतून निसटला, तर दिल्लीत ठाण मांडून सूत्रे हलवणारा म्होरक्या गंगाधर हा सीबीआयच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी व सरकार पक्षाकडून युक्तीवाद
याप्रकरणात लातुरमधील दोन आरोपींना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. दरम्यान, हा तपास आता सीबीआयकडे वर्ग झाला असून, पुन्हा लातूरच्या न्यायालयात जलीलखॉ पठाण, संजय जाधव यांना हजर करण्यात आलं. न्यायालयात सीबीआयने पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. आरोपी व सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.