Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. आझाद मैदानावर मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ऐक्य दाखवत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) टीका केली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर तीव्र टीका केली. महायुतीने (Mahayuti) जेव्हा मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं, तेव्हा ते टिकवू शकले नाहीत. आज आम्हावर बोलण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांच्या भूमिकेत दुटप्पीपणा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
जपानचा अमेरिकेला दणका! अब्जावधी रुपयांची मोठी डील थांबवली; मोदींच्या जपान भेटीचा इफेक्ट?
एकनाथ शिंदें काय म्हणाले?
मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. आजही त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळत आहे. कुणबी नोंदणीसाठी शिंदे समितीची स्थापना केली. ती आजही काम करतेय. सारथीच्या माध्यमातून विविध योजना सुरू केल्या, त्या देखील आजही चालू आहे. कुणाच्याही आरक्षणावर गदा येणार नाही. नियमात बसणाऱ्या आणि योग्य असलेल्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. 2016 वेळी देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिलं होतं, परंतु हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी त्यांना कोर्टात बाजू मांडता आली नाही, अशी टीका यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
लाईव्ह |📍 ठाणे ⏭️ 29-08-2025 पत्रकारांशी संवाद https://t.co/Aoh7zgYR9d
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 29, 2025
वारं फिरणार! उद्धव ठाकरे फिरवणार फडणवीसांना फोन; विषय नेमका काय?
विरोधकांची दुटप्पी भूमिका
मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे; त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी. गोळ्या घालण्याचं काम सरकारचं नाही, तर समाजात सौहार्द राखणं हे आमचं ध्येय आहे. शिंदे पुढे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणावर सामनामधून पूर्वी टीका केली होती. म्हणूनच त्यांना आज आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मराठा समाजाला न्याय देताना इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची पूर्ण खबरदारी सरकार घेईल.
आझाद मैदानावरील या उपोषणामुळे सरकारवर मोठं राजकीय दडपण आल्याचं दिसतंय. आता पुढील काही दिवसांत या आंदोलनाला काय स्वरूप येतं? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.