Deepali Sayyed : …तर तुला संपवून टाकू; दिपाली सय्यद यांना महिला नेत्याची फोनवर धमकी!

अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांना एका महिला नेत्याकडून फोनवर धमकी दिल्याचा धक्कदायक प्रकार समोर आलायं.

deepali sayyed

deepali sayyed

Deepali Sayyed : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रा आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांना एका महिला नेत्याने फोनवर संपवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलायं. दीपाली सय्यद नाशिकचा भोंदू अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. त्याआधीच त्यांना आलेल्या धमकीमुळे एकच खळबळ उडालीयं.

हर्षवर्धन सपकाळांचा निवडणूक आयोगाला इशारा; आषाढी वारीच्या काळातील SIR मोहिमेवर काँग्रेसचा आक्षेप

पुढील दिवसांत भोंदू अशोक खरातवर नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद काम करत आहेत. चित्रपटात काम न करण्यासाठी दीपाली सय्यद यांच्यावर दबाव टाकला जात आहे. एका महिला नेत्यानेच फोनवरुन धमकी दिल्याचं समोर आलंय.

सातत्यपूर्ण काम करून हिंदी सोबत मराठी इंडस्ट्रीत चर्चेत असणारी क्रॉसओव्हर क्वीन सई ताम्हणकर !

दीपाली सय्यद यांनी भोंदू अशोक खरातवर आधारित चित्रपटाचं काम थांबवलं नाही. या प्रकल्पातून बाहेर पडल्या नाही तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपवून टाकणार असल्याची धमकीच महिला नेत्याने दिलीयं. या धमकी प्रकरणावर आता दीपाली सय्यद काय भूमिका घेणार, पोलिसांकडे तक्रार करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दीपाली सय्यद नेमकं काय म्हणाल्या?
भोंदू अशोक खरातवर चित्रपट मी काढत नाहीये हा चित्रपट दुसरं कोणी काढतंय. प्रोड्युसर मी नाहीये. पण मी कलाकार म्हणून त्या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे. रुपाली ताईंबरोबर जे काही झालं असेल ते इतके वर्षापासून आहे असे दीपाली सय्यद म्हणाल्या.

Exit mobile version