देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; दरेगावात काय घडतंय? शिंदे मुंबईत कधी परतणार?

एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु, ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; दरेगावात काय घडतंय? शिंदे मुंबईत कधी परतणार?

देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन; दरेगावात काय घडतंय? शिंदे मुंबईत कधी परतणार?

Eknath Shinde Daregaon : देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेल्यानंतर ते आजारी पडले. (Eknath Shinde) त्यानंतर आज देवेंद्र फडणवीसांनी फोन करुन त्यांची विचारणा केली. दरम्यान, एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी असून आज ते ठाण्यासाठी रवाना होणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार-

एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु, ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे.

2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार

महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचंच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Exit mobile version