Download App

फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, फोटोग्राफीची आवड असलेला मुख्यमंत्री होतो तेव्हा…

देवेंद्र फडणवीस यांची कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंवर पॅशनवरून टीका. म्हणाले, फोटोग्राफी करणाला मुख्यमंत्री झाला तर समस्या होते.

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणसी यांनी एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता चांगलाच टोला लगावला आहे. आमदार अमित साटम यांच्या ‘उडान’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

नाव न घेता टीका एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची टी 20मधून निवृत्ती

फडणवीस यावेळी म्हणाले, अमित साटम नगरसेवकही नव्हते तेव्हापासून मी तुम्हाला पाहतोय. तुम्ही एक निवडणूक हरला होतात. आणि दुसऱ्या निवडणुकीसाठी तयारी करत होतात. आणि पुढे तुम्ही ती निवडणूक तुम्ही जिंकलात. तुम्ही खरंच तुमचं पॅशन करिअरच्या रुपाने घडवलं आहे असं म्हणत, पॅशन आणि करिअरबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचं नाव न घेता टीका केली.

 टाळ्यांचा कडकडाट

कधी काय होतं की कोणाला फोटोग्राफी आवडते आणि ते मुख्यमंत्री बनले तर समस्या निर्माण होते. मी कोणाचं नाव घेत नाहीयं, हा राजकीय कार्यक्रम नाही. पण मी एक उदाहारण देतोय. ज्या गोष्टीची पॅशन असतं ती आपण केली तर त्याचा फायदा होतो. असं म्हणत त्यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच टाळ्यांचा कडकडाट आणि हशा पिकला होता.

अभिमानाची गोष्ट IND vs SA : टीम इंडियाच ‘बादशहा’! 13 वर्षांनंतर ICC ट्रॉफी भारतात

अमित यांचं राजकारणात आक्रमक व्यक्तिमत्व आहे. लहानपणापासून श्रीकांत हा त्यांचा आवडता खेळाडू आहे. तेही आक्रमक होते. तसंच, अमित साटम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते शांत स्वभावाचे व्यक्ती आहेत. त्यांना त्यांच्या जीवनात आध्यात्मिक प्रेरणा रविशंकरजींमुळे मिळाली आहे. त्यांनी लिहिलेल्या या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते होणं ही अभिमानाची गोष्ट आहे असंही फडणवी यावेळी म्हणाले.

follow us