Police Constable Right Investigation : आता वरिष्ठ पोलिस हवालदाराला (Police Constable Right Investigation) पोलिस उपनिरीक्षकाचे अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलायं. याआधी पोलिस उपनिरीक्षकपदापासून वरिष्ठ अधिकारी एखाद्या गुन्ह्याचा तपास करीत असत, मात्र आता पोलिस वरिष्ठ हवालदारही गुन्ह्याचा तपास करणार आहे. गृह खात्यात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेत राज्य सरकारने हा निर्णय घेतलायं. राज्य सरकारने यासंदर्भात राजपत्र जारी केलं आहे.
पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक! पाकिस्तानी वस्तूंची ऑनलाईन विक्रीही बंद; अमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या राजपत्रात म्हटले, पोलिस वरिष्ठ हवालदार हा पदवीधर असावा, त्याने पोलिस खात्यात सात वर्षे सेवा केलेली असावी. यासोबतच नाशिक येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयात हवालदाराने विशेष प्रशिक्षण पूर्ण आणि उत्तीर्ण असणं गरजेचं राहणार आहे, असा पोलिस वरिष्ठ हवालदार गुन्ह्याचा तपास करणार असल्याचं राजपत्रात स्पष्ट करण्यात आलंय.
पाकिस्तानी एअर सिस्टम 23 मिनिटे टप्प, भारतीय हवाई दलाने असा केला हवाई हल्ला
राज्यातील शहरी भागात मनुष्यबळ कमी असले तरीही पोलिस अधिकाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास हा पोलिस उपनिरीक्षक पदापासून वरील अधिकाऱ्यांकडे दिला जातो. तर ग्रामीण भागात या अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे गुन्ह्याचा तपास असल्यास अधिकाऱ्यांवर ताण वाढत असल्याचं निदर्शनास आलंय. सध्या पोलिस भरतीमध्ये उच्चशिक्षित तरुण भरती होत असल्याने त्यांच्या अनुभवाची आणि बुद्धीमत्तेची दखल घेत त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय घेण्यात आलायं.
ब्रेकिंग : कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त विधान भाजप नेत्याला भोवलं; गुन्हा दाखल करण्याचे आदेश
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरचा ताण काही प्रमाणात कमी होणार असून गुन्ह्यांचा छडा लावण्याचा आलेखही वाढणार असल्याचा विश्वास गृह खात्याकडून व्यक्त करण्यात आला.