Download App

खोक्या असो, बोक्या असो, सगळ्यांना ठोकणार; सतीश भोसलेवरील कारवाईवरून फडणवीसांचा कडक इशारा

Devendra Fadnavis यांनी खोक्या भाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला आहे. वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यावर कडक इशारा दिला आहे.

Devendra Fadnavis stern warning over action against Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याला आणखी एक दणका बसला आहे. खोक्या भाईच्या घरावर थेट बुलडोझरच चालवण्यात आला आहे. वनविभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिला आहे.

CM फडणवीस दिल्लीत! PM मोदींची घेतली भेट, नेमकं कारण काय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेत, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. वर्ल्ड ऑडिओ, व्हीज्युअल अँड एन्टरटेंटमेंट समिट आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला दिल्याबद्दल या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांना खोक्या भाई उर्फ सतीश भोसले याच्यावरील कारवाईवरून प्रश्न विचारला असता त्यांनी कडक इशारा दिला. फडणवीस म्हणाले की, मी दिल्लीमध्ये वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहे. पण तरी यावर उत्तर देतो की, खोक्या असो, बोक्या असो, कुणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक इशारा दिला आहे.

मोठी बातमी! 1300 कोटींच्या घोटाळ्यात सत्येंद्र जैन, सिसोदियांवर FIR नोंदवण्यास मंजुरी

दरम्यान सतीश भोसलेने वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा दावा वनविभागाने केला आहे. सतीश भोसले फरार झाला होता. यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न केले जात होते. प्रयागराजमध्ये खोक्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला अटक केली.

क्रिएटिव्हीटीला बळ! मुंबईत होणार आयआयसीटी, केंद्रांचाही निधी; CM फडणवीसांनी केली घोषणा

शिरुरकासार तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण करताना सतीश भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत होती. तर आता 6 दिवसांनंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला प्रयागराजमधून उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी अटक केली.

आमीर खानकडून वयाच्या 60 व्या वर्षी प्रेमाची कबुली; कोण आहे आमीर डेट करत असलेली गौरी?

दरम्यान, वनविभागाने या अतिक्रमणाबाबत खोक्याला नोटीसही बजावली होती. यानंतर वनविभागाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली आहे. शिरुर पोलिसांच्या मदतीने बुलडोझर लावून खोक्याचं घर पाडण्यात आले आहे. बीडमधील शिरुरकासार पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खोक्या भाईवर चार गुन्हे देखील दाखल आहेत.

follow us