Devendra Fadnvis म्हणतात…झुकेगा नही तो घुसेंगा साला

उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणालेत, पण मी फडतूस नसून काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेंगा साला, असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला आहे. नागपुरात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेतून फडणीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविलाय. Devendra Fadnvis : अरे…नादान माणसा! तू सावरकर नाही अन् गांधीही नाही… फडणवीस म्हणाले, एकीकडे […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (41)

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (41)

उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणालेत, पण मी फडतूस नसून काडतूस आहे. झुकेगा नही तो घुसेंगा साला, असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढविला आहे. नागपुरात आज स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रेतून फडणीस बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढविलाय.

Devendra Fadnvis : अरे…नादान माणसा! तू सावरकर नाही अन् गांधीही नाही…

फडणवीस म्हणाले, एकीकडे राहुल गांधी सावरकरांचा अपमान करीत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मांडीला माडी लावून बसत आहेत. उद्धव काय होतास तू काय झालास तू असा कसा वाया गेलास तू? या शब्दांत त्यांनी ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादीत मोठी उलथापालथ होणार; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बदलणार; जयंत पाटील यांची माहिती

यात्रेदरम्यान बोलताना फडणवीस यांनी सावरकर यांना इंग्रजांनी दिलेल्या शिक्षेबाबत स्पष्ट केलं आहे. फडणवीस म्हणाले, अंदमानच्या छोट्याशा खोलीत सावरकरांना डांबलं होतं. तिथेच मलमूत्राचं विसर्जन कराव लागायचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

भारतात इंग्रज राजवट असताना 1857 चं बंड करण्यात आलं होतं. हे भारताचं पहिलं स्वातंत्र्ययुद्ध होतं असं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांविरोधात भारतभर पसरवलं होतं, असंही ते म्हणालेत.

राजेंद्र नागवडेंनी राहुल जगताप, शेलारांवर डागली तोफ !

जर स्वातंत्र्यवीर सावरकर माफीवीर असते तर इंग्रजांनी गुप्तहेर खात्याचा सर्वाधिक पैसा सावरकरांसाठी खर्च केला नसता असंही फडणवीसांनी सांगितलं असून मानवतेपेक्षा मोठा कोणताही धर्म नाही हे सांगणारे सावरकर होते, असंही फडणीसांनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्यानेच आम्हाला सावरकर गौरव यात्रा काढण्याची संधी प्राप्त झाली. त्यानिमित्ताने आम्ही घराघरांत सावरकर पोहचवत आहोत. त्याबद्दल राहुल गांधी यांचे फडणवीसांनी आभारही मानले आहेत.

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना फडतूस गृहमंत्री असं म्हटलं होतं. त्यानंतर राज्यभरातील भाजप नेत्यांनी ठाकरेंना चांगलंच घेरल्याचं पाहायला मिळालंय.

Exit mobile version