Dhananjay Munde Answer to Anjali Damania : राजकीय वर्तुळात सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीच झडत आहेत. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी हे प्रकरण उचलून धरत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यात त्यांनी या प्रकरणातील आरोपींशी मुंडेंचे संबंध असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी मागच्या सरकारमध्ये मुंडे कृषीमंत्री असताना कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.
PM मोदी अमेरिका दौऱ्यावर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसोबत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, अंजली दमानियांनी माझ्यावर गेल्या पन्नास दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू केले आहे. मात्र त्या करत असलेले आरोप हे धादांत खोटे आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी आहेत. तसेच त्यांना शेतीमधील काय कळतं? त्या शेतकरी आहेत का? जेणे करून त्या माझ्यावर कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत आहेत. असं म्हणत मुंडे यांनी दमानियांना प्रत्युत्तर दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून कसे सुटले? लाच देऊन की बादशाहला चकवा देत पराक्रम गाजवून?
तसेच अंजलीताई ‘बदनामियांनी’ इतके दिवस अनेकांना बदनाम केलं आहे. आता त्यांनी मला बदनाम करण्याचं काम घेतलं आहे. त्यांच्या या बदनाम करण्याच्या एपिसोडमध्ये मी आहे. त्यांच्या बुद्धीची किव येते.असं म्हणत त्यांनी दमानियांना उत्तर दिलं आहे. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्याा कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळातील कृषी साहित्याबाबत स्पष्टीकरण देखील दिले.
दुसरीकडे ज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची (Anjali Damania) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे केल्याचा गंभीर आरोपही दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केला.