Doctor Sexually Assaults Minor Girl In Sangamner : अहिल्यानगर – माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात घडली आहे. संगमनेर शहरातील एका नामांकित रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Ahilyanagar News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रुग्णालयावर धाव घेत गोंधळ घालून दगडफेक केली. अखेर हे रुग्णालय बंद पाडण्यात आले. दरम्यान या प्रकरणातील आरोपी डॉक्टरला नाशिक येथून अटक करण्यात (Doctor Sexually Assaults Minor Girl) आली. आरोप डॉक्टर कर्पे याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सलग चौथ्या दिवशी किमतीत घट, 24 कॅरेटचा भाव 90 हजारांच्या खाली
याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी संगमनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अल्पवयीन मुलगी एस. टी. बसने संगमनेरला आली होती. महाविद्यालयात गेल्यानंतर प्रकती अस्वस्थ वाटल्याने महाविद्यालय शहरातील करपे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविवारी पहाटेच्या सुमारास डॉ. अमोल कर्पे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या (Ahilyanagar Crime) मुलीच्या जवळ आला. ‘तुला बरं वाटतंय का?’ असे विचारून तिला टेरेसवर नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली. मात्र, ओरडलीस तर आई-वडिलांना सांगून तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी डॉक्टरने दिली.
मनसेच्या आंदोलनाचा विषय थेट संसदेत…राजेश वर्मांचा थेट राज ठाकरेंवर वार
घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त
हे प्रकरण समजताच मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. याठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. याप्रसंगी मोठा तणाव निर्माण झाला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी रुग्णालयावर दगडफेक केली आणि रुग्णालय बंद (Crime News) पाडलं. त्यानंतर ग्रामस्थांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टरवर कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी आरोपी डॉ. करपे याला नाशिक परिसरातून अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
डॉक्टरवर कठोर कारवाई करा- ठाकरेंची सेना आक्रमक
संगमनेर शहरातील शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी आज कर्पे रुग्णालयावर मोर्चा नेत आरोपी डॉ. अमोल कर्पेवर कठोर कारवाई करत, त्याचं लायसन्स रद्द करण्यात यावं, अशी मागणी केली. दरम्यान या घटनेचा माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील निषेध केला आहे. जयश्री थोरात यांनी देखील पोलिस ठाण्यात जात आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केलीय. जयश्री थोरात यांनी देखील पोलीस ठाण्यात जात आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केलीय.