सोनं खरेदीसाठी सुवर्णसंधी! सलग चौथ्या दिवशी किमतीत घट, 24 कॅरेटचा भाव 90 हजारांच्या खाली

Gold Prices Fall For Fourth Consecutive Day : अमेरिकेतील कर युद्धामुळे व्यापारी तणाव वाढत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तीव्र दबाव आहे. भारतातील सोन्याच्या किमती (Gold) सलग चौथ्या सत्रात देखील घसरत आहे. आठवड्याची सुरुवात मंदीच्या पातळीवर झाली, भारतातील सोन्याचे दर विक्रमी (Silver) उच्चांकावरून घसरले. गेल्या चार व्यापारी सत्रांमध्येच सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत सुमारे 3,650 रुपयांची घसरण झाली आहे, म्हणजेच 4% ची तीव्र घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 90,000 रुपयांच्या खाली आला आहे.
“फुले” चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
सोन्याचा दर झपाट्याने घसरला
भारतातील सोन्याचा दर आज 8 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) प्रति 10 ग्रॅम 650 रुपयांनी घसरून 89,730 रुपये झाला. तर भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर झपाट्याने घसरला. प्रति 10 ग्रॅम 600 रुपयांनी घसरून 82,250 रुपये झाला. त्याचप्रमाणे 18 कॅरेट सोन्याचा दर 490 रुपयांनी घसरून 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
भारतात चांदीचे दर सलग तिसऱ्यांदा कायम आहेत. 1 किलो चांदीची (Silver Price) किंमत 94,000 रुपये होती. तर भारतात 100 ग्रॅम चांदीचा दर 9,400 रुपये होता.
आज मुंबईत 18 कॅरेट सोने 6,730 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेटची किंमत 8,225 आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम 8,973 आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा भाव सध्या चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 89, 730 रुपये आहे, तर चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 82,250 रुपये आहे. बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 82,250 रुपये आहे, तर बंगळुरूमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 89,730 रुपये आहे. हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 82,250 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,730 रुपये आहे.
मनसेच्या आंदोलनाचा विषय थेट संसदेत…राजेश वर्मांचा थेट राज ठाकरेंवर वार
जागतिक व्यापार युद्ध आणि आर्थिक मंदी
ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे जागतिक व्यापार युद्ध आणि आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली असल्याने गुरुवारपासून व्यापारी इतर मालमत्तांसह मौल्यवान धातूची विक्री करत आहेत. राजकीय जोखमींमुळे सोन्याने मागणीत विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर काही दिवसांतच सोन्याच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरून सुरू असलेल्या गोंधळातही सोन्याच्या किमती घसरत आहेत. गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच सोन्याच्या किमती सलग तीन दिवस घसरत आहेत. यामुळे सोन्याची किंमत 3,000 डॉलर्सच्या खाली आली आहे.
सोन्याच्या दरात घसरण होण्याची कारणे
– डोनाल्ड ट्रम्पचे टॅरिफ धोरण
– सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं
– रिसायकल सोन्याचा पुरवठा वाढला
– सेंट्र्ल बँका सोन्याचा साठा कमी करणार