राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. या घडामोडींवर नगर दक्षिणचे भाजपचे खासदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sujay Vikhe said a cautious stance on Ajit Pawar’s rebellion, due to this in the state…)
अजित पवारांच्या बंडावर सुजय विखेंनी सावध भूमिका म्हणाले यामुळे राज्यात…#Sujayavikhe pic.twitter.com/Umns8U2Xhy
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) July 3, 2023
पवार-विखे घराण्याचा वाद राज्यात सर्वसृत आहे. परंतु आता हे दोघेजण एकाच सरकारमध्ये आहे. यावर बोलताना खासदार सुजय विखे यांनी सावध भूमिका घेत अजित पवारांच्या बंडावर बोलण्याचे टाळले. ते म्हणतात या सर्व वरच्या लेव्हलच्या घडामोडी मी छोटा कार्यकर्ता आहे. मी यावर काय बोलणार मी जनतेचे काम करत आहे. राज्यात हे जे नवीन समीकरण जुळले आहे. त्यामुळे राज्यातील विकासाला निश्चित गती येईल. पवार – विखे घराण्याच्या वादावर बोलताना विखे म्हणाले हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याने याला विखे कुटुंब किंवा आणखी दुसरं कोणतं नाव असे म्हणत सुजय विखेंनी पवारांचं नाव घेण्याचे टाळले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत नंतर ते बोलत होते. पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असून या तिन्ही मार्गावर वाहतुकीस अडथळा होऊ नये या करिता महामार्गाचे काम एका बाजूने युद्ध पातळीवर सुरू ठेवून दुसऱ्या बाजूने वाहतूक देखील सुरू ठेवावी अशा सूचना दिल्या, या भागात दुर्दैवाने कुठली दुर्घटना होणार नाही याची दक्षता घेवून काम सुरू ठेवावीत. आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी मदत कार्य करणारी क्रेन या सह इतर आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवावी असे सांगितले.
अजितदादांचा प्रदेशाध्यक्ष ठरला! थोड्याच वेळात होणार घोषणा…
याशिवाय या महामार्गाच्या
कामासाठी कृषी,बांधकाम, भूजल सर्वेक्षण, महावितरण या विविध विभागाशी संबंधित असणारे विषय हे तात्काळ मार्गी लावावे असे सांगून ज्या ज्या विभागाच्या ना हरकत तसेच इतर परवानगीसाठी कुठलीही दिरंगाई करू नये अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्तावर कुठल्याही प्रकारचे मोठमोठे खड्डे पडणार नाहीत याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.