Download App

अनिल परब यांचा पाय आणखी खोलात; ईडीकडून आरोपपत्र दाखल

Shivsena Leader Anil Parab :  ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. याचे कारण ईडीच्या वतीने विशेष पीएमएले कोर्टामध्ये अनिल परब यांच्या विरोधात  आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर मनी लॉण्डरिंगचे आरोप केले होते. या प्रकरणामध्ये ईडीने शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू व रिसॉर्टचे मालक सदानंद कदम व जयराम देशपांडे यांच्यावर कारवाई केली आहे.

रवींद्र धंगेकरांची उमेदवारी कशी फायनल झाली? नाना पटोलेंनी सांगितला किस्सा

अनिल परब यांना सध्या मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. परंतु ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तिघांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

Karnataka Election: प्रचाराच्या तोफा थंडविल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आले अडचणीत

या रिसॉर्टवर केंद्र सरकारच्या पर्यावर मंत्रालयानेदेखील कारवाई केली आहे. अनिल परब यांनी कायम माझा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे वारंवार जाहीर केले आहे. तरी देखील ईडीने त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले आहे.

Tags

follow us