Eknath Khadase Chalenge to Mangesh Chavhan on alligations of Immoral relationship : एकनाथ खडसे यांनी अनेकदा गिरीश महाजन यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले, त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्याविरोधात भाजप आमदारांनी एकत्रीत येत जळगावमध्ये पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे (Khadse) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता खडसेंनी चव्हाणांना आव्हान दिले आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
शुक्रवारी भाजपच्या सर्व आमदारांनी जळगाव मध्ये पत्रकार परिषद घेतली. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेण्याची ही पहिली वेळ असावी पण जर ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी घेतली असती तर आनंद वाटला असता पण ती एकनाथ खडसेंना टार्गेट करून करण्यासाठी घ्यावी लागली.त्यामागील त्यांची मजबुरी मी समजू शकतो. ही पत्रकार परिषद त्यांना इच्छा नसताना घ्यावी लागली. या सर्व आमदारांचे वेगवेगळे विषय मी योग्य त्यावेळी काढेल. त्यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही. कारण हे आमदार मीच वाढवलेले आहेत.
Eknath Shinde : शिरसाट-मिसाळ वाद एकनाथ शिंदेंच्या कोर्टात, म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या..”
त्यामध्ये त्यांनी हानी ट्रॅपिंग आणि प्रफुल लोढा बाबत काहीही बोलले नाही. यामध्ये मंगेश चव्हाणने माझ्यावर मोठा आरोप केला पण मी 1980 पासून 45 वर्ष सक्रिय राजकारणात आहे मी अनेक ठिकाणी नेतृत्व केलं. गिरीश महाजन 35 वर्षे आमदार आहेत मी 36 वर्ष आहे. मी पाच-पाच खात्यांचा मंत्री होतो कॅबिनेट मंत्री होतो. गिरीश महाजन केवळ अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत.
मावळचे राजकारण तापले ! सुनील शेळकेंकडून भाजपचा उमेदवार जाहीर; बाळा भेगडेंचा चिडून सल्ला…
त्यामुळे मी मंगेश चव्हाण यांना आव्हान देतो की माझ्या विरुद्ध एक छोटीशी गोष्ट जरी पुरावा म्हणून तुमच्याकडे असेल तर ती समाजाला दाखवा गप्पा मारू नका. तसे पुरावे असतील तर मी सक्रीय राजकारणातून निवृत्त होईल. असं आव्हान खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिले आहे.
काय म्हणाले होते मंगेश चव्हाण?
माझा आपल्याला सवाल आहे आणि माझं आपल्याला सांगणं आहे. तुमच्याच मतदारसंघातील एका व्यक्तीने माला काही गोष्टी सांगितल्या, त्याची जर मी जाहीर वाचता केली तर आपल्याला बाहेर तोंड काढायला जागा राहणार नाही. मी त्या व्यक्तीला तुमच्यासमोर जाहीर पत्रकार परिषदेमध्ये देखील आणतो. त्याने मला असं सांगितलं की एकनाथ खडसे हे अतिशय खालच्या स्ताराचा विचार करणारे नेते आहेत.
दीड हजार विद्यार्थ्यांना मिळाला रोजगार; पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचा पुढाकार
पुढे तो असं म्हणाला मी त्यांना अतिशय जवळून पाहातो. वीस वर्षांच्या यांच्या इतिहासात यांनी अनेक लोकांना संपवलं. जवळच्या लोकांना यांनी संपवलं, यांनी राजकारणात तर हे केलच, परंतु यांनी अनेक महिलांशी अनैतिक संबंध ठेवले, मी हे जबाबदारीनं तुम्हाला सांगतो आहे. जसं तुम्ही लोढाचं सांगितलं, लोढानं तुम्हाला सांगितलं म्हणून तुम्ही ते आरोप करत आहात, तुमच्याविरोधात देखील मला अशाच काही लोकांनी येऊ सांगतिलं आहे, की एकनाथ खडसे यांचे अनेक महिलांशी संबंध होते असंही ते म्हणाले. त्या महिला रात्र-रात्र यांच्याकडे येऊ राहायच्या, सकाळी लोकं त्यांना सोडायला जायचे, असा बघणारा व्यक्ती सांगत होता, असं मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.