Eknath Khadse : एकीकडे राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केले आहे. यावरून विरोधकांना सरकारला घेरलं आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुसकाना होऊनही एकही मंत्री बंधाऱ्यांवर दिसत नाहीये, असे म्हणत मी सुरत आणि गुवाहाटीत मंत्र्यांचा शोध घेतला पण ते तिथेही नाही असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही एकही मंत्री शेतकऱ्यांना भेटत नसल्याने खडसेंनी हा खोचक टोला लगावला आहे.
मागील पंधरा दिवसांपासून राज्यात अवकाळीने धूमाकुळ घातला आहे. यामुळे शेकऱ्यांचं मोठं नुकसान झाले आहे. असे असतानादेखील सत्ताधारी पक्षातील एकही मंत्री अद्यापर्यंत बंधाऱ्यांवर गेलेला नाही, पंचनामे झालेले नाही. मंत्री दिसत नसल्याने आपण सुरत आणि गुवाहाटीत चौकशी केली मात्र, दोन्ही ठिकाणांवर मंत्री नसल्याची माहिती मिळाली. पण मग मंत्री येथे नाहीत तर गेले कुठे? असा खोचक सवाल खडसेंनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेवरू आता सत्ताधारी नेमकं काय उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पंचनामे तरी करा; अजित पवारांची मागणी
तर, दुसरीकडे अवकाळी आणि शेतकऱ्यांंच्या नुकसानावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. आजही याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, आधीच शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागा, कांदा, मोहरी, टरबूज, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणावर नूकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आडवा झाला असून नूकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तरी करा, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.
तर, दुसरीकडे राज्यतला कर्मचारी वर्ग संपावर गेला आहे. संपावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नसल्याचा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. अद्याप शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे कोणतेही आदेश सत्ताधारी सरकारने दिले नसून निदान शेतकऱ्यांच्या नूकसानीचे पंचनामे करण्यासाठी तरी कर्माचाऱ्यांनी कामावर यावं असं आवाहन अजित पवार यांनी आज विधानसभेत कर्मचाऱ्यांनी केलंय.