Anil Jaisinghani : फडणवीसांना गोत्यात आणणारा जयसिंघानी असा देत होता पोलिसांना गुंगारा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 20T133319.549

Anil Jaysinghani Arrested :  बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मात्र, अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनिल जयसिंघानियाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अनिल जयसिंघानी हा एक कुख्यात बुकी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यावर एकुण 15 गुन्हे दाखल असून गेल्या 7 वर्षांपासून तो फरार होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या शोध घेत होते. 2015 साली त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली होती. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश व आसाम या राज्यातील पोलिस त्याच्या शोध घेत होते. लोकांवर गुन्हे दाखल करणे व पैसे उकळणे असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

मोठी बातमी : बुकी जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या

अनिल जयसिंघानी हा गेल्या सात वर्षांपासून पोलिसांना चकवा देत होता. तो कोणतेही सिम कार्ड वापरत नव्हता. त्याच्याकडे मोबाईल फोन होता. पण तो कधीमधे मोबाईल फोन वापरायचा. त्यामुळे पोलिसांना तो कुठे आहे हे कळू शकलेले नव्हते.  फोन करण्यासाठी तो वायफाय डोंगलचा वापर करायचा. तो डोंगल देखील वेगवेगळ्या कंपन्यांचे वापरायचा. कधी जिओ तर कधी एअरटेलचा डोंगल वापरायचा.  वायफायच्या आधारे तो इतरांना फोन करायचा. सोशल साईट्स, व्हॉट्सअॅप, टेलिग्रामचा वापर करुन तो मीडियाशी संपर्कात होता. जयसिंघानी सिम कार्डचा वापर करत नसल्यामुळे त्याला पकडणे अडचणीचे झाले होते. त्याला अटक करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. टेक्नॉलॉजिचा वापर करुन त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Ajit Pawar : शेतकरी आडवा झालाय, पंचनामे तरी करा…

अनिल जयसिंघानी याच्यावर बेटिंग व सट्टा लावण्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच लोकांना धमकावणे व त्यांच्याकडून पैसे उकळणे असे उद्योग तो करायचा. ईडीने गुजरातमध्ये बेटींगचे मोठे भांडाफोड केले होते त्यात जयसिंघानी हा एक होता.

काय आहे प्रकरण? 

अनिल जयसिंघानियाची मुलगी अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीसांना 1 कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या अनिक्षा जयसिंगानियाला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Amritpal Singh : खलिस्तानी आंदोलन, अमित शाहांना धमकी; कोण आहे अमृतपाल सिंग खालसा?

Tags

follow us