मोठी बातमी : बुकी जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या

  • Written By: Published:
मोठी बातमी : बुकी जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या; मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये ठोकल्या बेड्या

Anil Jaysinghani Arrested : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिल जयसिंलघानीची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांना एसक कोटींची लाचेची ऑफर केली होती. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. बुकी अनिल जयसिंघानिया गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. मात्र, अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अनिल जयसिंघानियाच्या मुसक्या आवळल्या असून, त्याला गुजराजमधून अटक करण्यात आली आहे. जयसिंघानी गेल्या सात ते आठ वर्षांपासून वाँटेड होता तसेच त्याच्यावर पाच राज्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.

MLC 2023: मुंबई इंडियन्सचा अटकेपार झेंडा, न्यूयॉर्कमध्ये चालवणार क्रिकेट संघ

अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षाने आपल्या वडिलांची एका गुन्हेगारी प्रकरणातून सुटका करण्यासाठी अमृता फडणवीसांना 1 कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानंतर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या अनिक्षा जयसिंगानिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिक्षाने 2015-16 च्या दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटली होती. त्यानंतर 2021 नंतर या मुलीने अमृता फडणवीस यांची भेट घेण्यास सुरूवात केली. आपण डिझायनर असून, आपले नाव प्रभावशाली 50 महिल्यांच्या यादीत असल्याचे सांगितले. एवढेच fनव्हे तर या मुलीने तिच्या आईवर लिहिलेल्या एका पुस्तकाचं प्रकाशनही अमृता फडणवीसांकडून करून घेतले.

धमक्या अन् दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, थोरातांचा विखेंना अल्टिमेटम

भेटीगाठी वाढल्यानंतर या मुलीने विश्वास संपादित करून आपल्या वडिलांना एका चुकीच्या प्रकरणात अडकवण्यात आल्याचे सांगितले. त्यांना यातून सोडवावे अशी विनंती या मुलीने केली. हा सर्व प्रकार राज्यातील सरकार बदलल्यानंतर घडला. यात अमृता यांना एक कोटींची ऑफर देण्यात आली होती. या सर्व प्रकरणानंतर राज्यात खळबळ माजली होती.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघानीया हा उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी असून, 2010 साली छोटा बुकी म्हणून ओळखला जात होता. 2010 मध्ये बेट घेताना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याला अटक करण्यात आली होती.  1995 मध्ये जयसिंघानियाने काँग्रेसकडून उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली होती. याशिवाय त्याने 1997 ला काँग्रेसकडून पुन्हा निवडणुक लढवली होती. मात्र यात त्याला पराभव पत्कारावा लागला होता. यानंतर त्याने  2002  साली राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि पालिका निवडणुकीत विजय मिळवला.  अनिल जयसिंघानिया मागील सात ते आठ वर्षांपासून फरार होता. त्याच्या विरोधात लूकआऊट नोटिसदेखील काढण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात देशातील पाच राज्यांमध्ये 15 गुन्ह्यांची नोंद आहे.  

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube