Eknath Shinde : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. मात्र यंदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मुख्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे.
एकनाथ शिंदे राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं सरकार स्थापनेपूर्वी नाराज होते मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपूर्वी नाराज असल्याचे बातम्या समोर आल्या होत्या आणि तर आता पालकमंत्रिपदावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या एका महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याने एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे या बैठकीला हजर नव्हते. माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्या यांच्या पक्षाच्या वतीनं गृह राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र दादा भुसे (Dada Bhuse) आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांना पालकमंत्रिपद मिळावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. दोघांही पालकमंत्रिपद देण्यात न आल्याने शिंदे नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर ते आपलं मुळगाव असलेल्या दरेगावला गेले होते. त्यानंतर सरकारकडून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिल्याने एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध कुठून लावला…, विखेंचा राहुल गांधींना सवाल