Cm Shinde and Fadanvis React on Badlapur Case : कोलकाता डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या हे प्रकरण ताज असतानाच आता बदलापूर पूर्व येथील घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. येथील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर अत्याचार झाल्याची ही घटना घडली आहे. या घटनेमुळे बदलापूरकर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तो चांगला व्यक्ती नाही कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणातील आरोपीच्या सासूने सांगितलं धक्कादायक सत्य
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न, पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्तांशी मी चर्चा केली आहे. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, असे निर्देश दिले आहेत. तसंच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्याची पार्श्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बदलापूर येथील घटनेनंतर पालक आणि बदलापूरमधील अनेक नागरिक संतप्त झाले असून ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आलं आहे. अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसंच हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
धक्कादायक! शाळेत चिमुरडीवर अत्याचार; अंगावर काटा आणणारी घटना, पोलिसांकडून कारवाईस दिरंगाई
केवळ एक माफीनामा
मुलींवर अत्याचार करणाऱ्या सफाई कर्मचारी पुरवणाऱ्या कंत्राटदारासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. सर्व पालक वर्गाची शाळेने जाहीर माफी मागितली आहे. असा शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तसंच, घडलेला प्रकार दुर्दैवी, घृणास्पद आणि निंदनीय आहे. संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी संस्थेचा आग्रह आहे. आरोपीविरोधात पूर्ण क्षमतेने संस्थेने पोलिसांना आम्ही सहकार्य केलं, असं शाळा प्रशासनाकडून या माफीनाम्यात नमूद करण्यात आलं आहे.