Kishor Darade : विधान परिषदेसाठी नुकत्याच पार पडलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या किशोर दराडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. (Nashik elections) मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे किशोर दराडे, (Kishor Darade) महाविकास आघाडीचे संदीप गुळवे आणि अपक्ष उमेदवरा विवेक कोल्हे यांच्यात जोरदार लढत पहायला मिळाली. मात्र,अखेर दराडे यांनी विजय मिळवला.
जातीनिहाय जनगणना करा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या, अमोल कोल्हेंची संसदेत मागणी
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी तब्बल 24 तास सुरु होती. पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे हे आघाडीवर होते. तर बाद फेरीतील मतगणनेत 18 उमेदवार बाद ठरवण्यात आले.
हिंदू हिंसक! संसदेत राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी; देवेंद्र फडणवीसांनी बजावलं
नाशिक शिक्षक मतदारसंघात विजयासाठी 31576 चा कोटा निश्चित करण्यात आला. त्यामुळे विजयासाठी किशोर दराडे यांना दुसऱ्या पसंतीची 5100 मतं आवश्यकता होती. त्यामुळे सध्या महायुतीचे किशोर दराडे यांचा विजय झाला. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी मात्र महाविकासआघाडीचे गणित बिघडवल्याचं दिसत आहे.