Loksabha Election 2024 : देशभरात पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता प्रत्येक मतदारसंघात 400 मराठा उमदेवार उभे करण्याचीही तयारी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांवर ताण येऊ नये म्हणून ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ पॅटर्नची निवडणूक अधिकाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. या पॅटर्नवर बंदीच घालण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून (Election Commission) घेण्यात आला आहे. निवडणुकीची अनामत रक्कम भरण्यासाठी उमेदवारांना एक हजार रुपयांपेक्षा अधिक चिल्लर देता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे.
…तर मी बारामतीसाठी ‘कमळ’ हाती घेणार; शिवतारेंच्या भूमिकेनं अजितदादा ‘चेकमेट’ होणार
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे यांनी निवडणुकीचा अर्ज भरताना डिपॉझिट रक्कम भरण्यासाठी रोख रक्कम नाणे स्वरुपात आणले होते. हाच पॅटर्न अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. उमेदवाराने नाणे स्वरुपात डिपॉझिटची रक्कम आणल्याने अधिकाऱ्यांना मोजता मोजता चांगलाच घाम फुटत होता. त्यामुळे आता यापुढे उमेदवारांनी अशा स्वरुपात डिपॉझिटची रक्कम भरता येणार नाही. उमेदवारांना फक्त एक हजार रुपयांचीच अनामत रक्कम नाणे स्वरुपात भरता येणार आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांना होणारा ताण आणि वेळ वाचणार आहे. आणि ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ पॅटर्नला आळा बसणार आहे.
रामदास आठवलेंच्या कारला अपघात, वाईजवळ कंटेनरने दिली जोरात धडक
राज्यात सध्या मागील काही दिवसांपासून प्रत्येक मतदारसंघातून 400 मराठा उमेदवार देण्याचं सांगितलं जात आहे. या उमेदवारांकडून निवडणुकीची अनामत रक्कम नाणे स्वरुपात जमा करण्यात येणार असल्याचंही बोललं जात होतं. असं केल्याने निवडणुक यंत्रणांना मोठा ताण आणि त्रासाला सामोरे जावं लागणार होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेऊन गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चित्रपटातील नारुसारख्या अनेकांना रोखलं आहे.
दरम्यान, उमेदवारांनी 1 रुपयांपर्यंतच चिल्लर स्वरुपात रक्कम घेणार असल्याचा निर्णय घेतला असला तरीही या निर्णयाविरोधात कोणीही उमेदवार न्यायालयात जाणार नाही हे कशावरुन? त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत जशी उमेदवारांची परीक्षा अगदी तशीच निवडणूक अधिकाऱ्यांचीही असणार आहे.