…तर मी बारामतीसाठी ‘कमळ’ हाती घेणार; शिवतारेंच्या भूमिकेनं अजितदादा ‘चेकमेट’ होणार

  • Written By: Published:
…तर मी बारामतीसाठी ‘कमळ’ हाती घेणार; शिवतारेंच्या भूमिकेनं अजितदादा ‘चेकमेट’ होणार

बारामती : आगामी लोकसभेसाठी बारामतीच्या आखाड्यात सुप्रिया सुळें विरोधात सूनेत्रा पवार मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंचे शिलेदार विजय बापू शिवतारेंनी आपण बारामतीमधून अपक्ष मैदानात उतरणार असल्याचं रणशिंग फुंकलं. त्यामुळे येथील निवडणूक तिरंगी होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता अपक्ष म्हणून बारामतीच्या मैदानात उतरणाऱ्या शिवतारेंनी मोदींच्या विजयासाठी वेळ पडल्यास हाती कमळ घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवतारेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे अजितदादा अडचणीत येऊन चेकमेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवतारे म्हणाले की, माझी भूमिका मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) समाजावून सांगितली आहे. मी ‘अबकी बार 400’ पार साठी बारामतीत कमळाच्या चिन्हावरही लढण्यास तयार आहे. माझ्या या भूमिकेमुळे माझ्यावर पक्षांतर्गत कारवाईदेखील होऊ शकते. त्यामुळे जर, माझ्यावर कारवाई होणार असेल तर, मी राजीनामा देतो असेही विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) म्हटले आहे. (Vijay Shivtare Reday For Election On BJP Symbol In Baramati)

पवारांनी भाकरी फिरवली; धनुभाऊंचा खास माणूसच पंकजांचा पेपर अवघड करणार!

देसाईंना समजावून सांगितली सर्व गणितं

शिवतारे म्हणाले की, दोन दिवस मी मुंबईत होतो. तेथे वेगवेळ्या नेत्यांशी चर्चा झाल्याय यात विशेषतः शिंदेंपर्यंत काही निरोप पाठवण्यासाठी शंभुराजे देसाईंशी माझी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान देसाई यांना बारामतीची सीट आपण कशी जिंकू शकतो याची सर्व कॅलक्युलेशन्स समजावून सांगितल्याचेही शिवतारे म्हणाले.

लोकांची मानसिकता विजय बापू असतील तर…

गेल्या दहा दिवसांपूर्वी जेव्ह मी कार्यकर्त्यांसोबत शिंदेंना भेटो होतो. तेव्हादेखील ही सीट महायुतीमध्ये आपल्यासाठी मागून घ्या अशी मागणी केली होती. तसेच शिवसेनेच्या चिन्हावर ही जागा अगदी आरामात जिंकू शकतो असा विश्वासही मी दिला होता. याशिवाय ज्या पद्धतीने शिरूरची सीटिंग सीट राष्ट्रवादीला गेली तेथे उमेदवार नव्हता म्हणून आढळराव पाटील तिकडे गेले. त्यानंतर मी दोन पर्याय दिले एक म्हणजे शिवसेनकडून विनंती करून महायुतीकडून बारामतीची जागा मिळवली तर आणि लोकांची मानसिकता विजय शिवतारे असतील तर, धनुष्यबाणाच्या चिन्हावर ही सीट 100 टक्के ही जिंकू शकतो असे सांगितल्याचेही शिवतारे म्हणाले.

सुनेत्रा पवार, शरद पवारांनंतर आता शिवतारेंचा डाव; पवारांचे विरोधक कुणाला देणार बारामतीचा ‘ताज’

मोदींना तिसऱ्यांदा PM बनवण्यासाठी एक एक खासदार महत्त्वाचा

तसे बघितले गेल्यास गेल्या 10 ते 20 वर्षापासून बारामतीची जागा भाजपची आहे. मात्र, अगदी भाजपच्या चिन्हावर जरी लढायचं असेल तर, त्यासाठीदेखील माझी काही हरकत नसल्याचे शिवतारे म्हणाले. संपूर्ण विचारमंथन लोकांशी बोलून वगैरे मी या निर्णयापर्यंत आल्याचेही शिवतारे म्हणाले. अपक्ष हा नंतरचा भाग आला पण, जर कदाचित महायुतीतून काही निर्णय झाले तर ते सोयीचे होतील. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी नेत्यांना बारामतीची सीट महायुतीकडून शिवसेनेसाठी मागून घ्यावी तसे न झाल्यास मी भाजपच्या कमळ चिन्हावरही बारामतीमधून निवडणूक लढलण्यास तयार असल्याचे शिवतारेंनी म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज