Deepak Kesarkar on Maharashtra Elections : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त एक (Maharashtra Elections 2024) दिवस राहिला आहे. उद्या सकाळपासूनच निकाल हाती येण्यास सुरुवात होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचं सर्व चित्र स्पष्ट झालेलं असेल. निकालाआधी मात्र महायुती आणि महाविकास आघाडीकडून विजयाचे दावे केले जात आहेत. मतदानाच्या काही एक्झिट पोल्समध्ये महायुती तर काही एक्झिट पोल्समध्ये महाविकास (Exit Polls 2024) आघाडीचं सरकार येईल असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता उद्याच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
काही एक्झिट पोल्सने असाही अंदाज व्यक्त केला आहे की महायुती किंवा महाविकास आघाडीला अपक्षांना सोबत घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही. तेव्हा दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत किती बंडखोर आणि अपक्ष निवडून येतील याचा अजून तरी अंदाज नाही. या पार्श्वभुमीवर शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू असे केसरकर म्हणाले आहेत.
राज्यात पुन्हा महायुती सरकार, टुडेज चाणक्य अन् ॲक्सिस माय इंडियाचा अंदाज काय?
केसरकर पुढे म्हणाले, निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आम्ही महायुती म्हणून सरकार स्थापन करू शकतो हे तपासून पाहू. जर गरज पडली तर आम्ही अपक्षांना देखील सोबत घेऊन सरकार स्थापन करू. या निवडणुकीत साधारण 10 ते 15 अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे असे केसरकर यांनी स्पष्ट केले. केसरकर यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभेच्या 288 जागांसाठी काल (दि.20) मतदान पार पडल्यानंतर संध्याकाळी प्रमुख संस्थांचे एक्झिट पोल समोर आले होते. त्यात एक दोन संस्थांनी सोडलं तर, सर्वांनी राज्यात पुन्हा महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, या सर्व धामधुमित अॅक्सिस माय इंडियाचा पोल समोर आला नव्हता. परंतु, आता ॲक्सिस माय इंडियानेदेखील त्यांचा पोल जाहीर केला असून, राज्यातील बहुसंख्य मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असे सांगण्यात आले आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला राज्यात 178 ते 200, महाविकास आघाडीला 82 ते 102, वंचित बहुजन आघाडीला शून्य तर, अन्य पक्षांना 6 ते 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महायुती-मविआ अलर्ट! मॅरेथॉन बैठका, हॉटेल खोल्या अन् स्पेशल विमाने बुक, स्ट्रॅटेजी काय?