Download App

लोकशाहीचा मुडदा पडला तरी.., जितेंद्र आव्हाडांचा खास शैलीत घणाघात

ठाणे : राहुल गांधींनी तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलं नाही किंवा गलिच्छ शिव्याही दिलेल्या नाहीत, पण खिंडीत पकडले गेलं की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी, यामध्ये लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नसल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींवर लोकसभा सचिवालयाने केलेल्या कारवाईनंतर आव्हाड यांनी एका पोस्टद्वारे भाजपवर निशाणा साधला आहे.

‘शरद पवारांची कुठं बी चालते’, ‘त्यांनी उठोबा-बठोबा’.. गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

आमदार आव्हाड यांनी राहुल गांधींनी वक्तव्य केल्यानंतर ते कारवाईच्या संपूर्ण घटनाक्रमावर आपल्या शैलीत टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, “राहुल गांधी यांना ज्या बदनामी प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली, त्या प्रकरणातील काही बारीक तपशील तपासले तर हा सगळा कसा भोंदू प्रकार आहे हे लक्षात येईल. Devil lies in the details असं इंग्रजीत म्हणतात. तर मग चला काही तपशील तपासू” अशी सुरुवात त्यांनी पोस्टद्वारे केलीय.

तसेच या प्रकरणाचा खटला 2019 मध्ये दाखल झाला. अशावेळी प्राथमिक चौकशी करायची आणि नंतरच दावा दाखल करून घ्यायचा असा न्यायव्यवस्थेत संकेत आहे. पण तशी प्राथमिक चौकशी न करता तो दाखल करून घेण्यात आला. त्यावर राहुल गांधींच स्टेटमेंट 2021 साली नोंदविण्यात आलं. त्यांनी पुन्हा स्टेटमेंट द्यावं, अशी विनंती अर्जदार पूर्णेश मोदी 2022 साली करतो.

नागपूर हादरलं ! प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

तत्कालीन मुख्य दंडाधिकारी दवे ही विनंती फेटाळून लावतात. त्यानंतर पूर्णेश मोदी हायकोर्टात जाऊन स्वतःच दाखल केलेल्या खटल्यावर स्थगिती आणतो. आणि दवे यांची बदली होते आणि त्यांच्या जागेवर वर्मा नावाचे गृहस्थ येतात. पूर्णेश मग स्वतःच आणलेली स्थगिती हायकोर्टाकडून स्वतःच उठवून घेतो, शेवटी कर्नाटकात केलेल्या भाषणाबद्दल बदनामीचा दावा सुरतच्या कोर्टात दाखल का झाला? हा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेचा उर्दूत बॅनर; शिंदे म्हणाले, बाळासाहेब असते तर…

आव्हाड पुढे पोस्टमध्ये म्हणतात, पूर्णेशचं मूळ नाव पूर्णेश भूतवाला असं आहे. राहुल गांधींवर खटला दाखल करण्यापूर्वी तो चपळाईने सरकार दरबारी आपलं नाव “पूर्णेश मोदी” असं बदलून आला. मोदी आडनावाची बदनामी ही ओबीसी समाजाची बदनामी आहे असा गळा आता भाजपावाले काढतायत. इतकं प्रेम आहे तर ओबीसींच्या जनगणनेला विरोध का करतात? असा सवालही त्यांनी केला आहे.

दरम्यान, भारताच्या इतिहासात अशा गुन्ह्याला इतकी मोठी शिक्षा झालेली नाही. त्यांनी तमाम मोदी आडनावाच्या लोकांना चोर म्हटलेलं नाही की, गलिच्छ शिव्या दिल्या नाहीत. पण खिंडीत पकडले गेले की लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं यात त्यांची हातोटी आहे. मग त्यात लोकशाहीचा मुडदा पडला तरी बिघडत नसल्याचं ते म्हणाले आहेत.

Tags

follow us