Download App

VIDEO: संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर कुणाचा प्रभाव; आई-वडिलांचा उल्लेख करत काय म्हणाले?

माझ्या तालुक्यात कुठंही सप्ता असला तरी मी जातो. गावातील सप्ता सुरू असताना मी एका जागेवर बसून किर्तन ऐकतो. त्यामुळे त्या

  • Written By: Last Updated:

Sambhaji Patil Nilangekar Exclusive : निलंगा तालुक्याता कुणालाही विचारा मी कधीच कुणाला रागावत नाही. अनेक लोकांचं मत आहे की तुम्ही का रागावत नाही. तर जन्म झाला म्हणून आपण एखाद्या कुटुंबाचे असतो पण हा मतदारसंघच माझं कुटुंब आहे अशा भावना निलंगा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केल्या आहेत. (Sambhaji Patil) ते लेट्सअप मराठीवर लेट्सअप चर्चा या मुलाखतीत बोलत होते. दरम्यान, त्यांनी यावेळी आपल्यावरील प्रभावाचाही खुलासा केला.

माझ्या तालुक्यात कुठंही सप्ताह असला तरी मी जातो. गावातील सप्ताह सुरू असताना मी एका जागेवर बसून किर्तन ऐकतो. त्यामुळे त्या गोष्टींचाही माझ्यावर मोठा प्रभाव पडला आहे असंही ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर तुम्ही इतकं शांत बोलता, सुसंवादी बोलताना याच गमक काय असं विचारलं असता संभाजी पाटील म्हणाले की, हे सगळं संस्कारातून आलं आहे. लढण्याचं आणि लोकांच्या सेवेचा वसा वडिलांकडून आला आहे. तर, आध्यात्मिक वारसा आईकडून आला आहे असंही निलंगेकर यावेळी म्हणाले.

महायुतीच्या योजनांमुळेच गोरगरिबांचं उत्पन्न वाढलं; संभाजीराव पाटील निलंगेकर

यावेळी त्यांनी मराठवाडा वॉटरग्रीड योजनेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, या योजनेची चर्चा करून आमच्यासारखे राजकारणी लोक करमणूक करत आहेत असं वक्तव्य करून काही लोक काय म्हणाले, उजनीचं पाणी आणतो. त्यावेळी उजनीच्या माणसाने याला विरोध केला. एक माणूस म्हणतो उजनीचं पाणी आणतो. तर उजनीचा माणूस म्हणतो रक्ताचे पाट वाहतील पण पाणी देणार नाहीत असं म्हणत त्यांनी पाणी देण्याला विरोध केला. त्यामुळे हा फक्त वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे असंही ते यावेळी म्हणाले.

आम्ही या विषयावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे विषय काढला. जे समुद्रातून वाहून जातं किंवा पुराच पाणी आहे ते आम्हाला द्या. तसंच, जे आवश्यकेपेक्षा जास्त पाणी आहे ते आमच्या नद्यांना सोडा अशी मागणी केली. मराठावाडा वॉटर ग्रीड योजना हीच आहे की जे तुमचा वाहून जाणार पाणी आहे, जे जास्तीच पाणी आहे ते आपल्याला मिळणार आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत. तसंच, सतत पाणी असणाऱ्या भागातील पाणी आम्हाला द्याव असंही ते यावेळी म्हणाले.

follow us