अरविंद पाटील निलंगेकरांनी घेतले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या पालखीचे दर्शन
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा पालखी सोहळा लोखंडी सावरगा येथे दाखल झाल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.

निलंगा : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज (Dr. Shivling Shivacharya Maharaj) यांच्या श्री क्षेत्र कपिलधार महापदयात्रेच्या पायी दिंडीतील दुसरा रिंगण सोहळा लोखंडी सावरगा येथे संपन्न झाला. या सोहळ्याला भेट देऊन पालखीचे तसेच उपस्थित गुरुवर्यांचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर (Arvind Patil Nilangekar) यांनी दर्शन घेतले.
‘भूल भुलैया 3’ची बॉक्स ऑफिसवर 200 कोटी पेक्षा जास्त कमाई, टीमने केले जंगी सेलिब्रेशन!
शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याशी माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आणि त्यांच्या परिवाराोचे अनेक वर्षापासून घनिष्ठ संबंध होते. आत्तापर्यंत केलेल्या कोणत्याही कार्याची सुरुवात त्यांनी शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या दर्शनाने केली आहे. शिवाय विधानसभेमध्ये त्यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणीही संभाजीराव पाटील निलंगेकरांनी केली होती. दरम्यान, शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि निलंगेकर यांचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून दृढ आहेत.
Teosa Vidhansabha : मतदारसंघाच्या विकासालाच प्रथम प्राधान्य, यशोमती ठाकूरांनी सांगितलं व्हिजन
यावेळी शिवाप्पा भुरके, बसु राजुरे, रतन रेडडी, बुद्धिवंत मुळे, इंजी कस्तुरे, अमर सोरडे, प्रसाद सोरडे, प्रकाश पटने, मनोज कोळ्ळे, शेषेराव मंमाळे, मंगेश गाडीवान, प्रमोद सोमवं, जनार्धन सोमवंशी आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.