Download App

आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघात, “देशभक्तीचे खोटे प्रमाणपत्र वाटणाऱ्यांचे खरे चेहरे उघड

Aditya Thackeray : भाजपच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसोबत आनंद घेतल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) नेते आणि

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : भाजपच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसोबत आनंद घेतल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना (Shivsena) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरेंनी ट्विट करत भाजपवर हल्लाबोल केला. “मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या अंधभक्तांनी आता भाजपच्या नेत्याकडेही पाहावे. हा नेता पाकिस्तानच्या जाहीररित्या भारतविरोधी भूमिका मांडणाऱ्या क्रिकेटपटूसोबत बसून सामना पाहत होता,” असे त्यांनी म्हटले.

भाजपच्या दुटप्पीपणावर सवाल

आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, “हा तोच माजी मंत्री आहे, ज्याचे पक्षाचे नेते प्रत्येक विरोधकाला ‘पाकिस्तानला जा’ असे सांगतात आणि तोच मंत्री रस्त्यावर ‘देश के गद्दारों को’ असे ओरडतो. मग आज खरा गद्दार कोण?” “जर हा नेता इतर कोणत्याही पक्षाचा असता, तर त्याच्यावर गद्दारीचा आरोप झाला असता, एफआयआर दाखल झाले असते, आणि त्याला पाकिस्तानला जाण्यास सांगितले गेले असते. पण भाजपच्या नेत्यांसाठी वेगळे नियम आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

हिंदू-मुस्लिम तेढ वाढवण्याचा आरोप

आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर निशाणा साधत म्हटले, “भाजपचे खरे धोरण म्हणजे आपल्या देशातच फूट पाडणे, हिंदू-मुसलमानांत दुरावा निर्माण करणे, आणि त्यामुळे सत्तेवर राहणे. पण याच भाजपचे नेते आणि त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसोबत ऐश करताना दिसतात. बीसीसीआयवर भाजपचे नियंत्रण असताना, बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाल्याच्या बातम्या व्हायरल करून भाजपने देशभरात गोंधळ घातला. पण त्याच भाजपने नंतर बांगलादेशसोबत अनौपचारिक क्रिकेट स्पर्धा खेळली. निवडणुका झाल्यावर हिंदूंचे प्रश्न आणि देशभक्ती हे भाजप विसरते, पण गरज पडली की त्याच गोष्टींचे राजकारण करते,” असेही त्यांनी म्हटले.

‘ऑपरेशन टायगर’ अन् मविआचे खासदार फुटणार? शरद पवार स्पष्टच बोलले…

भाजपचे खोटे राष्ट्रप्रेम उघड करा

“भाजपला जर पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायचे असेल, तर हा फोटो दाखवा आणि त्यांना विचारा – हे योग्य आहे का?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. माझी देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे. माझा आदर करा, मी तुमचा करेन. पण कोणत्याही प्रकारच्या द्वेषाशी तडजोड नाही, कोणाकडूनही नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेनी भाजपवर प्रखर टीका केली.

follow us