Download App

लाडकी बहीण योजनेबद्दल खोटा प्रचार पण…, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जन सन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज श्रीवर्धन आणि चिपळूण विधानसभा

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची जन सन्मान यात्रा (Jan Samman Yatra) आज श्रीवर्धन आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात पार पडली. लाडकी बहीण योजना पुढे देखील सुरूच राहणार आहे आणि या योजनेमध्ये कोणत्याही स्वरूपातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही तसेच विरोधक लाडकी बहीण योजनेबद्दल खोटा प्रचार करत आहेत असं अजित पवार म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) , श्रीवर्धनच्या आमदार आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) देखील अजित पवार यांच्यासोबत होते.

या वेळी अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना अधिकाधिक स्वावलंबी बनवणे हा आमचा उद्देश आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्याबाबत मी आणि आदिती तटकरे यांनी सुरुवातीला चर्चा केली होती असेही यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत राख्या बनवून 20 हजार रुपये कमावणाऱ्या महिलेची गोष्ट देखील यावेळी सांगितली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सरकारने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरु केले आहे. ज्यामध्ये 3 मोफत गॅस सिलिंडर, लेक लाडकी योजना, पींक ई-रिक्षा योजनेचा समावेश आहे तसेच शेतकऱ्यांसाठी सरकार बळीराजा वीज सवलत योजना राबवत आहे आणि युवांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवत आहे असेही या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले.

तर राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करू शकतात मात्र महायुती म्हणून आम्ही प्रभावीपणे सहकार्य करण्यासाठी एकत्रित कार्यक्रम आयोजित करत आहोत असेही यावेळी अजित पवार म्हणाले. तसेच राज्याचे उद्योग महाराष्ट्रातच राहणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

तर या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजनेसारख्या परिवर्तनकारी योजना आणल्या आहेत. राज्याचा 10 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ते एकमेव मंत्री आहे. विरोधक आज कल्याणकारी योजनांवर करत आहे मात्र विरोधक टीका करण्यातही अपयशी ठरले आहे. कारण लोकांनी या योजनांना स्वीकारलं आणि लोकप्रियही केलं असं सुनील तटकरे म्हणाले.

आदिती तटकरे यांनी यावेळी बोलताना, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल अजित पवार यांचे आभार मानले. यावेळी अदिती तटकरे म्हणाल्या की, आतापर्यंत जवळपास 1.6 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे.

… तर मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील, नितीन गडकरींनी दिला जनतेला कानमंत्र

सप्टेंबरपर्यंत 2.45 कोटी नोंदणी पूर्ण झाल्या आहेत आणि येत्या काही दिवसात आम्ही 2.50 कोटी महिलांना लाभ देण्याचं लक्ष गाठणार आहोत. श्रीवर्धन मतदारसंघात जवळपास 75 हजार महिलांनी नोंदणी केली असून 70-75% आधीच योजनेचा लाभ घेत आहेत, असेही आदिती तटकरे म्हणाल्या.

follow us