‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी नोंदणी कधीपर्यंत? आदिती तटकरे यांचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
‘माझी लाडकी बहिण’ योजनेसाठी नोंदणी कधीपर्यंत? आदिती तटकरे यांचा मोठा निर्णय

Aditi Tatkare On Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला
(Majhi Ladki Bahin Yojana) जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. सरकारकडून या योजनेचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अनेक अडचणी येत आहेत. बँकेमध्ये खाते नसणे, खाते आधार लिंक नसणे या अडचणीमुळे महिलांना अर्ज भरता येत नव्हते. त्यात सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare ) यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे तटकरे यांनी जाहीर केले.

राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुरस्कारप्राप्त शिक्षकांची संपूर्ण यादी पाहा…

तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबरही सुरू राहणारआहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तीन महिन्यांचे एकाचवेळी साडेचार हजार रुपये मिळणार आहेत.

ठाकरेंची लायकी नाही ते भ्रष्ट नेते, नारायण राणेंचा ठाकरेंसह शरद पवारांवर हल्लाबोल


तांत्रिक अडचणींमुळे महिलांचे हेलपाटे

या योजनेसाठी अर्ज भरताना महिलांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या योजनेसाठी सुमारे दीड कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. परंतु 40 ते 42 लाख महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार लिंक नाहीत. त्यामुळे आधार लिंक करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहेत. त्यामुळे या महिलांचा अर्ज मंजूर झाले असले तरी त्यांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube