लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार दुसऱ्या टप्प्यातील पैसे, आदिती तटकरेंची मोठी घोषणा
Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेचे 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्ट पासून या योजनेत अर्ज केले आहे त्यांना पैसे मिळणार आहे. सध्या ऑगस्ट महिन्याचे अर्जाची छाननी सुरु आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात 45-50 लाख महिलांना पैसे मिळणार आहे असं माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या.
तसेच राज्यात होणाऱ्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात एक विशेष समिती स्थापन करण्याबाबत आज मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून या प्रकरणात आरोपी सुटला जाऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची देखील माहिती यावेळी त्यांनी दिली. बदलापूरची घटना निंदनीय असून पुढे असं होऊ नये यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक जिआर आणला आहे. जर शिक्षकांकडून असे कृत्य झाले तर त्याच्यावर कारवाई करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला आहे असेही माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच त्यांचे निलंबन झाले तर त्यांना निकाल येईपर्यंत कुठलाही लाभ मिळू नये अशी तरतूद देखील करण्यात आलेली आहे असेही माध्यमांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
दुसरीकडे बदलापूर प्रकरणात राज्य सरकारने मोठी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे तसेच या प्रकरणात शालेय शिक्षण विभागाने ठाणे आणि मुंबईच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (Thane) निलंबित केले असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाच्या तापासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थानप केली आहे.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा मोठा निर्णय, लागू होणार सुधारित पेन्शन योजना
तर गृहविभागाने देखील या प्रकरणात कारवाई करत बदलापूरच्या पोलीस निरीक्षक शितोळे यांचे निलंबन करून त्यांची मुंबईला बदली केली आहे. तर एसआयटीने POCSO च्या कलम 21 अंतर्गत शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.