पडळकर अन् मी दोघंही फाटकी माणसं; सदाभाऊंनी सांगितले मैत्रीचे गुपित

Sadabhau Khot On Gopichand Padalkar :  गोपीचंद पडळकर हा अत्यंत छोट्या गावातून आलेला कार्यकर्ता आहे मी स्वतः त्याच्या गावाकडे गेलो आहे त्याच्या घरी मुक्काम देखील केलेला आहे अनेक वेळा त्यांनी आम्हाला त्याच्या घरी थांबवलं चहा नाश्ता दिला लहानपणापासून कशा पद्धतीने तो लढत इथपर्यंत आला आहे ते मी पाहिजे आहे असे राज्याची माजी मंत्री सदाभाऊ खोत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T175239.750

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 01T175239.750

Sadabhau Khot On Gopichand Padalkar :  गोपीचंद पडळकर हा अत्यंत छोट्या गावातून आलेला कार्यकर्ता आहे मी स्वतः त्याच्या गावाकडे गेलो आहे त्याच्या घरी मुक्काम देखील केलेला आहे अनेक वेळा त्यांनी आम्हाला त्याच्या घरी थांबवलं चहा नाश्ता दिला लहानपणापासून कशा पद्धतीने तो लढत इथपर्यंत आला आहे ते मी पाहिजे आहे असे राज्याची माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे

सदाभाऊ खोत हे लेट्सअप मराठीच्या लेट्सअप सभा या कार्यक्रमात बोलत होते. लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांना गोपीचंद पडळकर व तुम्हाला पवारांवर टीका करायला फडणवीसांनी सांगितले आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता यावर त्यांनी उत्तर दिले आहे.

‘मूठभर मैदान अन् मूठभर संख्या’; मविआच्या सभेवरुन शेलारांचा टोला

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रॉब्लेम आहे. वंचित असलेल्या एखाद्या पोरगा, ग्रामीण भागातला मुलगा, मातीतला मुलगा, शेताभातातला मुलगा इथे आला की येथील टोळकं त्याला जमवून घेत नाही. रेल्वेच्या डब्यामध्ये जशाप्रकारे आत मध्ये घुसून देत नाही आणि घुसला तर बसायला जागा देत नाही तशी येथील परिस्थिती आहे, असे सदाभाऊ म्हणाले आहेत.

गोपीचंद पडळकर हा ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे. तो  बोलायला लागला आहे.  समाज त्याला का उचलतो तर, तो विस्थापितांचे प्रश्न मांडतो. प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा संघर्ष फार जुना आहे आणि गोपीचंद पडळकर हा विस्थापितांचे नेतृत्व करतोय, असे सदाभाऊंनी सांगितले आहे.

मी काय शिलाजीतची भाकरी खातो का? लैंगिक शोषणाच्या आरोपावर ब्रिजभूषण भडकले

तसेच आमची भाषा ही गावाकडची भाषा आहे. ज्याला आमची भाषा बरी वाटत नसेल त्याने आमच्या भाषेत शिकायला यावं. इंडियाची भाषा ते बोलतात. आम्हाला इंडियाची भाषा जमत नाही. उद्या आम्हाला पुण्याची अथवा मुंबईची भाषा बोलायला लावली तर ती जमणार नाही. पवार साहेब हे गावातून वर आले. गाव त्यांना विसरलं, असा टोला त्यांनी पवारांना लगावला आहे. तसेच  गोपीचंद पडळकर आणि मी आम्ही दोघेही फाटके माणस आहोत.  फाटक्या माणसांचे कायम जमते त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असे उत्तर त्यांनी दिले आहे.

Exit mobile version