Farmer Long March : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट; मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरदेखील शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरूच असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक दादा जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  यामुळे या आंदोलनाला गालबोट लागले आहे. शेतकऱ्याच्या मृत्युंनंतर दादा भूसे यांनी […]

Eknath Shinde

Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरदेखील शेतकऱ्यांचा लाँग मार्च सुरूच असून, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, या आंदोलनातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पुंडलिक दादा जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.  यामुळे या आंदोलनाला गालबोट लागले आहे.

शेतकऱ्याच्या मृत्युंनंतर दादा भूसे यांनी मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचे सांगितले आहे. या शेतकऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर मंत्री दादा भूसेंनी मृत शेतकऱ्याच्या कुटूंबियाला मदत जाहीर केली आहे.

शेतकरी आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार, जे.पी. गावितांनी ठणकावून सांगितलं

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल कांद्याला देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता देण्यात येणाऱ्या 300 रुपयांच्या अनुदानाऐवजी आता शेतकऱ्यांना कांद्यासाठी 350 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत घोषणा केली आहे. याबाबत शिंदेंकडून विधानसभेत निवेदनही देण्यात आले आहे.

Old Pension Scheme : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय : संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केली ‘ही’ घोषणा!

पण हे  आंदोलन सुरु ठेवायचं की नाही याबाबत आम्ही ठरवणार असल्याचं शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी ठणकावून सांगितलं आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर मागे हटणार नसल्याचंही गावित यांनी सांगितलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत विधानसभेत भूमिका स्पष्ट केलीय. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नसून आम्हाला ते मिळाल्यावर ते आमच्या लोकांना दाखवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

 

Exit mobile version