शेतकरी आंदोलनाची दिशा आम्ही ठरवणार, जे.पी. गावितांनी ठणकावून सांगितलं
मुंबई : शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका विधानसभेत मांडली आहे, त्यानंतर आंदोलन सुरु ठेवायचं की नाही याबाबत आम्ही ठरवणार असल्याचं शेतकरी नेते जे.पी. गावित यांनी ठणकावून सांगितलं आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशाची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर मागे हटणार नसल्याचंही गावित यांनी सांगितलं आहे.
Amruta Fadnvis : ऑफर देणारी ‘ती’ महिला आहे तरी कोण?
गावित पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत विधानसभेत भूमिका स्पष्ट केलीय. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची प्रत अद्याप आम्हाला मिळालेली नसून आम्हाला ते मिळाल्यावर ते आमच्या लोकांना दाखवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
तसेच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आम्ही चर्चा करु, त्यानंतरच शेतकऱ्यांचं आंदोलन पुढे सुरु ठेवायचं की परत माघारी जायचं हे आम्ही ठरवणार असल्याचं स्पष्टीकरण गावित यांनी दिलंय.
Ahmednagar Politics : राजेंद्र नागवडेंनी श्रीगोंद्यासाठी ठोकला शड्डू
शेतकऱ्यांच्या एकूण 14 मागण्या असून यावर कमी अधिक प्रमाणात चर्चा झाली आहे. सर्व विषय मार्गी लागणार नाही, पण अनेक योजनाांबाबत निर्णय झाले आहेत. 40 ते 50 टक्के मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मंत्री दादा भुसे यांनी दिलीय.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान पाचशे रुपयांचं अनुदान द्यावं, अशी शेतकऱ्यांची मागणी केली तर मुख्यमंत्री शिंदे यांनी 300 वरुन आता 350 रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा विधानसभेत केलीय.
शेतकऱ्यांना दिलासा..! खतांच्या अनुदानाबाबत मोदी सरकारने दिले ‘हे’ उत्तर
दरम्यान, विविध मागण्यांसदर्भात शेतकऱ्यांचा लॉंगमार्च मोर्चा नाशिकहुन विधानसभेवर धडकला आहे. या लॉंगमार्चमध्ये हजारो शेतकरी आपल्या कुटुंबियांसह पायात चप्पल न घालता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र दिसून येत आहे. कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसून त्यात आता निसर्गाने मूड बदलल्याने राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं होतं नव्हतं त्या पिकांचं नूकसान झालं आहे.