FDA takes action on MLA Residence Canteen : आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे पथक कॅन्टीनमध्ये दाखल झाले असून त्यांनी खाद्यपदार्थ आणि इतर गोष्टींची कसून तपासणी सुरू केली.
मोठी बातमी! मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये कुणाचं नावं?
आमदार निवासातील अन्नपदार्थांच्या दर्जाबाबतच्या तक्रारीनंतर आणि आमदार गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीच्या घटनेनंतर कॅन्टीनमध्ये अन्न आणि औषध प्रशासन (FDA) चे पथक दाखल झाले. या पथकाने कॅन्टीनमधील जेवणाचे काही नमुने गोळा केलेत. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधील संपूर्ण स्टोअर रूमची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान त्यांनी खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे नमुने गोळा केले. हे सर्व नमुने सील करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीच्या वेळी स्टोअर रूमचे ऑडिटही केलं. या संपूर्ण घटनेचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
कुणबी प्रमाणपत्र अडवण्यावरून जरांगे पाटील भडकले; मंत्री शिरसाटांवर केला गंभीर आरोप
प्रकरण काय?
काल (८ जुलै) रात्री आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रुममध्ये जेवणही पुरवण्यात आलं. मात्र, जेवणात देण्यात आलेलं डाळ आणि भात हे शिळं होतं आणि त्याचा वास येत होता, असा आरोप करत आमदार गायकवाड यांनी थेट कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरलं आणि कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली.
याबाबत बोलताना गायकवाड म्हणाले की, काल रात्री वरण भात आणि पोळीची ऑर्डर केली होती. त्यात भातासाोबत वरण मिक्स करून मी पहिला घास घेताच मला खराब वाटला. मला वाटले वरणामध्ये चिंच असेल, म्हणून मी पोळीसोबत दुसरा घास घेतला असता मला वोमिटिंग झाला. त्यामुळे मी वरण चेक केले असता ते पूर्णपणे सडलेले होते, असा गायकवाड म्हणाले.
दरम्यान, अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याबद्दल गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर फडणवीसांनी लोकप्रतिनिधींनी कर्मचाऱ्यांना मारहाण करणे चुकीचे आहे, असं सांगत सभागृहातील अध्यक्षांनी गायकवाडांनी केलेल्या मारहाणीची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. जी काही कारवाई करायची असेल ती करण्यात यावी, असं फडणवीस म्हणाले.