Rohit Pawar : काहीच दिवसांपूर्वी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. त्यानंतर आता दुसऱ्या एका प्रकरणात रोहित पवारांवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात (Azad Maidan Police Station) पवारांविरोधात ही एफआयआर दाखल करण्यात आली. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळं रोहित पवारांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली.
..अखेर ‘तो’ तरुण अल्पवयीन युवतीसह ताब्यात; सावंतवाडी अन् बीड पोलिसांची संयुक्त कारवाई
दोन दिवसांपूर्वी विधानमंडळाच्या लॉबीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. या घटनेचा सर्वस्तरातून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं. त्यामुळं वातावरण आणखीच चिघळलं होता. नितीन देशमुख यांना अटक केल्यामुळं आव्हाड चांगलेच आक्रमक झाले होते. देशमुख यांच्या अटकेविरोधात रोहित पवार हे देखील आमदार आव्हाडांसोबत थेट पोलिस ठाण्यात गेले आणि तिथे त्यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घातला.
Honey trap प्रकरणाची लिंक जळगावपर्यंत; राजकीय नेत्यांशी जवळीक असलेल्या लोढाला अटक
नेमके प्रकरण काय?
विधान मंडळातील गोंधळानंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या कार्यकर्त्याला भेटण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलीस ठाण्यामध्ये नसल्याचे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली होती.
शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. आवाज खाली, हातवारे करून आमदारासोबत बोलायचं नाही, असा इशाराही रोहित पवारांनी दिला होता. आमदार पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबरोबरत त्यांचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला.