..अखेर ‘तो’ तरुण अल्पवयीन युवतीसह ताब्यात; सावंतवाडी अन् बीड पोलिसांची संयुक्त कारवाई

..अखेर ‘तो’ तरुण अल्पवयीन युवतीसह ताब्यात; सावंतवाडी अन् बीड पोलिसांची संयुक्त कारवाई

Beed Crime : बीड येथील युवकाला त्या मुलीसहीत शनिवारी संध्याकाळी सावंतवाडी (Beed) पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी ताब्यात घेतले. सावंतवाडी शहरात गेली पाच महिने भाड्याच्या घरात अल्पवयीन मुलीसोबत राहत होता. बीड येथे त्या मुलावर मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. त्यावरुन पोलिसांनी ही कारवाई केली.

बीडमधील नारायण गडाचा वाद पेटला ! ट्रस्टी व महंत का भिडेलत ?

सायंकाळी उशीरा बीड पोलीस त्या दोघांना घेवून रवाना झाले. बीड येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिला सावंतवाडी येथे एका भाड्याच्या घरात गेली पाच महिने तेथील युवकाने ठेवले होते. ही मुलगी अल्पवयीन असून तिच्या वडिलांनी बीड पोलिसात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती त्यावरुन अपहरण व पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.गेली पाच महिने बीड पोलीस या मुलीचा शोध घेत होते.

दरम्यान, ती सावंतवाडीत असल्याची माहिती मिळताच बीड पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर शनिवारी बीड पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले. एका भाडयाच्या घरात राहणार्‍या त्या युवकाला व अल्पवयीन मुलीला सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube