कल्याणीनगर अपघातातील ‘तो’ कारचालक अल्पवयीनच; न्यायालयाने फौजदारी खटल्याचा अर्ज फेटाळा

कल्याणीनगर अपघातातील ‘तो’ कारचालक अल्पवयीनच; न्यायालयाने फौजदारी खटल्याचा अर्ज फेटाळा

Porsche car Accident In Pune : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन संगणक अभियंत्यांच्या मृत्यूला (Pune) कारणीभूत ठरलेल्या पोर्श कार अपघातप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. यातील अल्पवयीन चालकावर प्रौढांप्रमाणे खटला चालवावा, यासाठी पुणे पोलिसांनी केलेला अर्ज बाल न्याय मंडळाने फेटाळला आहे. त्यामुळे आता या १७ वर्षीय मुलावर बाल न्याय कायद्याअंतर्गत बाल न्याय मंडळापुढेच खटला चालवला जाणार आहे. हे प्रकरण महाराष्ट्रासह देशभरात गाजलं होतं.

कल्याणीनगर येथे १९ मे २०२३ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पोर्श कारने दोन दुचाकीस्वार संगणक अभियंत्यांना जबर धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस तपासात असं निष्पन्न झाले की, अपघातावेळी वाहन चालवत असलेला आरोपी फक्त १७ वर्षांचा होता आणि त्याने त्याआधी पबमध्ये मद्यपान केलं होतं. त्यामुळे या आरोपीला प्रौढ घोषित करून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेनुसार खटला चालवण्यासाठी पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळाकडं अर्ज केला होता.

पुणे पोर्श हिट अँड रन प्रकरण,त्या अधिकाऱ्यांना धक्का, पोलीस दलातून होणार बडतर्फ

निर्भया प्रकरणानंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 वर्षांवरील अल्पवयीन मुलांना सज्ञान समजून खटला चालवता येतो. मात्र, त्यासाठी बाल न्याय मंडळाची परवानगी घ्यावी लागते. स्वतः तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली होती. त्यानुसार, विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाला सज्ञान म्हणून समजून खटला चालवण्यात यावा अशी मागणी पोलिसांनी केली होती.

प्रकरण काय?

19 मे 2024 मध्ये कल्याणीनगर भागात रात्री एका भरधाव पोर्शे गाडीने एक तरुण आणि एका तरुणीला धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. ही पोर्श कार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित असल्याचं समोर आलं होतं. बार आणि पब मध्ये पार्टी करून मोठ्या प्रमाणात मद्यपान करून अल्पवयीन मुलगा ही कार चालवत असल्याचं प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितलं होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube