अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम ‘या’ तारखेपर्यंत वाढला; बाल न्याय मंडळाचा आदेश
Kalyaninagar Accident Case New Update : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहातून घरी सोडण्यास पोलिसांनी विरोध केला आहे. (Pune Police) बचाव पक्षाकडून अल्पवयीन आरोपीला घरी सोडण्याची विनंती करण्यात आली होती. (Pune Crime) आता दोन्ही बाजूची सुनावणी संपली आहे. (Vedant Agarwal) पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवावे, अशी मागणी केली आहे. अल्पवयीन आरोपीचे समुपदेशन सुरु आहे, अल्पवयीन आरोपीची घरी रवानगी झाल्यास तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अल्पवयीन आरोपीला 25 जून पर्यंत बाल न्याय कोठडी वाढवण्यात आली आहे.
अल्पवयीन आरोपीचे आई, वडील, आजोबा अटकेत असल्याचे समजल्यास त्याच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अल्पवयीन आरोपीची घरी रवानगी झाल्यास नातेवाईकांच्या मदतीने पुरावे नष्ट करण्याची देखील शक्यता आहे. असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. सुनावणी पूर्ण झाली असून अल्पवयीन आरोपीबाबतचा निर्णय 18 जूनला घेण्यात येईल, अस म्हणत न्यायालयाने कामकाज स्थगित केलं आहे.
काय आहे प्रकरण?
19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांनी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. या कमिटीच्या निर्णयानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Car Accident : फोन जप्त करा, नार्को टेस्ट करा; अजितदादांचे नाव घेत दमानियांची मोठी मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर घटनस्थळी भेट देऊनही कंट्रोल रूमशी संपर्क केला नसल्याने क्राईम पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.