Pune Car Accident : फोन जप्त करा, नार्को टेस्ट करा; अजितदादांचे नाव घेत दमानियांची मोठी मागणी
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात रोज नव-नवीन खुलासे होत असाताना आता या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानियांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. मी पुणे अपघाताच्या मुळाशी जाणार असल्याचा इशाराही दामानिया यांनी दिला आहे.तसेच अजितदादांचा फोनदेखील जप्त झाला पाहिजे असेही दामानिया यांनी म्हटले आहे. (Anjali Damania Demand Narko Test Of Ajit Pawar)
जुन्या खड्ड्यात नवं रोप; पुणे अपघात प्रकरणातील ‘SIT’च्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे खंडीभर आरोप
अंजली दमानिया काल (दि.27) एक्स वर एक व्हिडिओ ट्विट करत पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांनी पोलिसांना फोन केला होता का? असा सवाल पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला होता. जर अजित पवारांनी फोन केला असेल तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अजित पवारांचा राजीनामा घेणार का? असा सवालदेखील त्यांनी या व्हीडीओमध्ये उपस्थित केला आहे. त्यानंतर आता त्यांनी थेट या प्रकरणात अजितदादांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
दामानिया म्हणाल्या की, अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता की नाही हे स्पष्ट सांगावे. हाच प्रश्न आयुक्तांनादेखील असून, जर दादांचे फोन आले असतील तर, ते कशासाठी आले होते हेदेखील सांगावे अशी मागणी दामानिया यांनी केली आहे. तसेच टिंगरे हे कुणाच्या सांगण्यावरून पोलीस ठाण्यात आले होते? ते तिथे काय करत होते? याचे स्पष्टीकरण टिंगरेंना देखील विचारले पाहिजे असे दामानिया यांनी म्हटले.
Pune Accident : आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलले; डॉक्टरांना पोलिस कोठडी, न्यायालयात काय घडलं?
…तर मलाही शिक्षा द्या
दामानिया यांनी काल (दि.27) व्हिडिओ करत अजितदादांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी यावर स्पष्टीकरणे दिले. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, मी कधीच कोणाला सोडवण्यासाठी फोन करत नाही. मला एखाद्या प्रकरणात फोन करायचा असेल तर मी पोलीस अधिक्षकांना करेल, ग्रामीणचा विषय असल्याचे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांना करेल, असे अजितदादांनी सांगितले. याप्रकरणी कुठलाही दबाव नाही, कुणीही पळवाट काढता कामा नये, जो कुणी दोषी असेल त्याला शासन झालं पाहिजे. मी दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या, असे म्हणत अजितदादांनी दामानियांचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आता दामानियांनी अजित पवारांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.
बाकी पक्षाचे पदाधिकारी झोपलेले असताना एकट्या धंगेकरांनी ‘यंत्रणेला’ घाम फोडलाय…
दमानिया यांचे आरोप बिनबुडाचे
दामानिया यांनी पुण्याचे पोलीस आयुक्तांचे ना घेत अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, पोलीस आयुक्तांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. दामानिया यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचे पुण्याचे पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी म्हटले आहे.